घरमहाराष्ट्रराज्यात मिशन बिगीन अगेन तीन टप्प्यात निर्बंध हटवणार

राज्यात मिशन बिगीन अगेन तीन टप्प्यात निर्बंध हटवणार

Subscribe

केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली असून येत्या ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र लॉकडाऊन सुरू करतानाच राज्य सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. राज्यात अनलॉकचा पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होईल, दुसरा टप्पा ५ जूनपासून तर तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. लॉकडाऊन ५.० मध्ये नियम मोठ्या प्रमाणात शिथिल केले असले, तरी कंटेनमेंट झोनमध्ये केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणेच आत्ता होता तसाच लॉकडाऊन लागू राहणार आहे. हे कंटेनमेंट झोन कुठे कसे असतील, हे ठरवण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र, असे करताना नागरिकांनी देखील नियम शिथिल केले म्हणजे लगेच गर्दी होणार, असे न करता जबाबदारी ओळखून पुरेशी काळजी घेऊनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

३ जूनपासून काय असणार बंद
*रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे..
*मॉल्स, मोठे मार्केट बंद राहतील.
*मेट्रो, लोकल आणि आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक पुढील निर्णयापर्यंत बंद राहतील..
*स्थानिक पातळीवर कंटेनमेंट झोन ठरवण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील..
*शाळा, महाविद्यालये पुढील निर्णय होईपर्यंत बंदच असतील
*चित्रपटगृहे, जिम, स्विमिंग पूल, उद्यानं, नाट्यगृह, बार, मोठे हॉल बंद राहतील
*सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यासाठी गर्दी
*धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळं बंद असतील
*सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहतील

- Advertisement -

३ जूनपासून हे असेल सुरू
*सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग व इतर व्यायाम प्रकारांना एकत्र न जमता सार्वजनिक खुल्या ठिकाणी परवानगी
*लहान मुलांसोबत पालक असणे आवश्यक
*जवळच्याच खुल्या जागेत या व्यायाम प्रकारांसाठी जाता येईल
*प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल अशा सेवा सुरू होतील
*गाड्या रिपेअरिंगचे गॅरेजेस सुरू होतील. मात्र, तिथे जाण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल
*सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) फक्त १५ टक्के कर्मचारी
*पार्किंगच्या व्यवस्थेनुसार सम आणि विषम तारखेनुसार सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी

५ जूनपासून हे असतील बदल
*सर्व बाजारपेठा, दुकाने सुरू होतील; पण दुकाने पार्किंगप्रमाणे सम आणि विषम पद्धतीने सुरू करण्याची परवानगी असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने सुरू ठेवता येतील.
*कपड्यांसारख्या दुकानांमध्ये ट्रायल रुम किंवा एकदा घेतलेली वस्तू परत करण्याची परवानगी नसेल.
*दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे ही दुकानदाराची जबाबदारी असेल.
*लोकांनी शक्यतो चालत किंवा सायकलवर बाजारात जाण्याचं सरकारकडून आवाहन.
*जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तूंसाठी घरापासून फार लांब जायची परवानगी नसेल.
*टॅक्सीमध्ये प्रवास – फक्त अत्यावश्यक कारणासाठी १ अधिक २ प्रवासी.
*रिक्षा प्रवास – फक्त अत्यावश्यक कारणासाठी १ अधिक २ प्रवासी.
*कार प्रवास – फक्त अत्यावश्यक कारणासाठी १ अधिक २ प्रवासी.
*बाईक – फक्त अत्यावश्यक कारणासाठी १ प्रवासी.

- Advertisement -

८ जूनपासून हे असतील बदल
*सर्व खासगी कार्यालये १० टक्के कर्मचारी ऑफिसात आणि उर्वरित कर्मचारी वर्क फ्रॉम होम या पद्धतीने सुरू होतील.
*खेळाची मैदाने खेळाडूंना सरावासाठी आणि खेळासाठी खुली होतील. मात्र, प्रेक्षकांना मैदानात परवानगी नसेल.
*सामान्य प्रवाशांसाठी बाईक – १ प्रवासी.
*सामान्य प्रवाशांसाठी रिक्षा – १ + २ प्रवासी.
*सामान्य प्रवाशांसाठी कार – १ + २ प्रवासी.
*जिल्ह्यामध्ये बस प्रवास सुरू होईल. मात्र, या बसमध्ये फक्त ५० टक्के प्रवासीच नेण्याची परवानगी असेल.
*जिल्ह्याबाहेर बस प्रवासाची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत नसेल.
*सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनच्या नियमांचे पालन करत सर्व दुकाने खुली ठेवण्याची परवानगी असेल -सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील.
*दुकानांमध्ये गर्दी दिसल्यास स्थानिक प्रशासन ही दुकाने बंद करू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -