Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर माफीनामा; नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर माफीनामा; नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

Subscribe

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. जळगावात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. जळगावात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली आहे. आज-काल हिजडे सुद्धा आमदार होतात, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यानंतर बच्चू कडू यांनी लगेचच चूक लक्षात येताच आज-काल आंडू पांडू लोकही आमदार होतात, असं आपल्याला म्हणायचं होतं, अशी सारवासारव केली. (Maharashtra Government First the controversial statement then the apology What exactly did Bachchu Kadu say)

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू म्हणाले की, मी आमदार होणार की नाही याची मला पर्वा नाही. मात्र, शेतकऱ्याची पर्वा असणारा प्रहार पक्ष आहे, असं ते म्हणाले. ज्याच्या बोलण्यात दम नसतो. त्याच्या ओठावर मिशी नाही, दाढी नाही. चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असेही लोक आमदार होतात. हिजडेसुद्धा आमदार होतात, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यांचा हा रोख कोणाच्या दिशेनं होता हे कळताच उपस्थित कार्यकर्त्यांना हसू आवरलं नाही. मात्र, आमदार बच्चू कडू यांनी लगेचच त्या शब्दाबद्दल माफीही मागितली. आंडू… पांडू आमदार होतात, असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता , असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

(हेही वाचा: …हेदेखील सनातन सत्य आहेच, ठाकरे गटाचे भाजपावर शरसंधान )

बच्चू कडूंचा हल्लाबोल

जळगावातील सावदा इथे काँग्रेसच्या र‌ॅलीत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. या घटनेचाही बच्चू कडू यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असं करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रकार प्रहार जनशक्ती खपवून घेणार नाही, संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -