घरताज्या घडामोडीNew Year Guidelines: नववर्षासाठी राज्यसरकारकडून गाईडलाईन्स जारी

New Year Guidelines: नववर्षासाठी राज्यसरकारकडून गाईडलाईन्स जारी

Subscribe

जाणून घ्या नववर्षासाठी गाईडलाईन्स

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी येत्या ५ जानेवारीपर्यंत लागू करण्यात आली असताना आता ३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाच्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात नागरिकांना अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच राहून करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

३१ डिसेंबरसाठी अशा आहेत गाईडलाइन्स

१. कोरोनाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

- Advertisement -

२. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

३. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्यादृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

४. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या तसेच आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

५. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये, तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

६. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

७. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

८. कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

९. ३१ डिसेंबर २०२० आणि नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील पालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.


हेही वाचा – औषध वितरकांच्या १४ दिवसांच्या आंदोलनानंतरही सरकार थंड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -