घरताज्या घडामोडीवाहन चालकांसाठी खूशखबर! 1 एप्रिलपासून राज्यात CNG स्वस्त होणार

वाहन चालकांसाठी खूशखबर! 1 एप्रिलपासून राज्यात CNG स्वस्त होणार

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी झाली आहे. 

उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दिनांक १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजी कमी झालेले नवे दर दिनांक १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायू, घरगुती पाईपगॅसच्या मूल्यवर्धित करात १०.५ टक्के कपात करण्याची घोषणा करून केली होती. या निर्णयाचा लाभ महिला, रिक्षा, टॅक्सीचालक, खासगी वाहनधारक यांना होणार असला तरी राज्याच्या महसुलात अंदाजे ८०० कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने काल सीएनजीवरील करकपातीची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.


हेही वाचा – PNG CNG Rate Hike : पेट्रोल- डिझेल, एलपीजीपाठोपाठ आता पीएनजी- सीएनजी महागले; जाणून घ्या…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -