घरमहाराष्ट्रसरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर! वयोमर्यादा शिथिल

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर! वयोमर्यादा शिथिल

Subscribe

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्याच्या सरकारी सेवेत ज्यांना जायचे आहे त्यांना...

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्याच्या सरकारी सेवेत ज्यांना जायचे आहे त्यांना एमपीएससीने आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी सेवेतील प्रवेशाच्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 3 मार्च रोजी राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर आता एमपीएससीने आज यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलंय.

ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांनी वाढली आहे. विविध कारणामुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी 2 मार्च 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाद्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोनाकाळातील दोन वर्षात राज्यात सरकारी नोकरभरती झाली नव्हती. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थांना आता अर्ज करता येत नव्हते. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी वयाची मर्यादा शिथिल करण्यातची मागणी करण्यात आली होती. याबाबत 2 मार्च 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारने याबाबतचा निर्णय घेतला. सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक जारी करून वयाची मर्यादा शिथिल केल्याचे जाहीर केलं होतं. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

‘या’ भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये शिथिलता

उपअभियंता, विद्युत , गट अ
उपसंचालक, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
मुख्य खोदन अभियंता, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सहाय्यक रसायनी, गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सहाय्यक प्रशासन अधिकारी,गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास योजना
सहाय्यक आयुक्त, तांत्रिक, महाराष्ट्र तांत्रिक सेवा गट ब
सहाय्यक संचालक, राज्य रेशीम सेवा गट अ
रेशीम विकास अधिकारी राज्य रेशीम सेवा, श्रेणी एक, गट ब
सहाय्यक संचालक, गट ब सांस्कृतिक कार्य संचालनालय
महाराष्ट्र राज्यपत्रीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
या सर्व जाहिरातीमध्ये अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यास अंतिम दिनांक 3 एप्रिल 2023 पर्यंत असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -