एसटी महामंडळावर पुन्हा आर्थिक संकट! सरकारकडून सवलतीचे 600 कोटी थकल्याचा आरोप

msrtc did not get 600 crore rupees from maharashtra government of concessional schemes fare said st congress

राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांची लाइफलाइन लालपरी अर्थात एसटी पुन्हा आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारकडून विविध सवलतीचा येणारा निधी एसटी महामंडळाला मिळाला नसल्याचा आरोप एसटी कर्मचारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. सदरची रक्कम देण्यासाठी सरकार टाळाटाळ करत असून फक्त एसटीला सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

एसटी बसमध्ये विविध समाज घटकातील नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. यात प्रामुख्याने स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्यासोबतचा सहप्रवासी, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, पाचवी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांच्यासोबत प्रवास करणारा सहकारी, डायलेसिस रुग्ण अशा अनेकांना मोफत प्रवासाची मुभा दिली आहे. तर काहींना प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत दिली जातेय.

एसटी बसमध्ये अशाप्रकारे एकूण 29 सवलती दिल्या जात आहेत. या सवलतींचा पैसा सरकारकडून महामंडळाला दिला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही रक्कम थकली असून वर्ष 2021 आणि 2022 मधील ही एकूण थकबाकी रक्कम 398 कोटींवर गेली आहे. यातील अंदाजे 600 कोटींची रक्कम सरकारकडे थकीत आहे. मात्र सदरची रक्कम देण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा सरकारने दिल्या असा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी एसटीमधील प्रवाशांची संख्या 25 लाखांवरून 50 हजारांवर पोहचली होती, परिणामी एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली, एसटीचे उत्पन्न 14 कोटींवरून 23 कोटींच्या घरात पोहचले. मात्र काही दिवसांनी एसटीचे उत्पन्न हे 14 कोटींच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे एसटीच्या आर्थिक स्थितीबाबत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


ह्रदयद्रावक! सोलापुरात पुलावरून कोसळून एकाचवेळी 11 काळविटांचा मृत्यू