Maharashtra Unlock: सिनेमा, नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने खुली होणार, राज्यातील १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल, नवी नियमावली जाहीर

Maharashtra government new corona guidelines announced for 14 district
Maharashtra Unlock: सिनेमा, नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने खुली होणार, राज्यातील १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल, नवी नियमावली जाहीर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. आता राज्यातील १४ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले असून राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये चित्रपटगृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, हॉटेल्स, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये ५० टक्के क्षमतेचे अट कायम असणार आहे. यामध्ये ठाणे, नाशिक, नगरसह इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकारची ही नवी नियमावली ४ मार्चपासून म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहे.

कोणते निर्बंध शिथिल करण्यात आले

खासगी आणि सरकारी कार्यालय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

सामाजिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा उत्सवाशी संबंधित कार्यक्रमासाठी हॉल किंवा मैदान ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी. यात लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचा देखील समावेश.

सर्व शाळा, कॉलेज ऑफलाईन सुरू करण्यास परवानगी

अंगणवाडी आणि शिशुगटांचे वर्ग सुरू करण्याची परवानगी

होम डिलिव्हरी सेवा सुरू

चित्रपटगृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

शिवाय मॉल्स, क्रिडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, गार्डन इत्यादी ठिकाण १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा

लसीकरण झालेल्या व्यक्तीला जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी परवानगी.

लसीकरण न झालेल्या व्यक्तीला निगेटिव्ही आरटीपीसीआर अहवाल प्रवासासाठी बंधनकारक.

कोणत्या निकषांवर १४ जिल्ह्यांमधले निर्बंध केले शिथिल?

ज्या जिल्ह्यांमध्ये लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी असून आयसीयूमध्ये ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात भरले आहेत अशा १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

निर्बंध शिथिल करण्यात आलेले १४ जिल्हे कोणते?

मुंबई शहर
मुंबई उपनगर
पुणे
भंडारा
सिंधुदुर्ग
नागपूर
रायगड
वर्धा
रत्नागिरी
सातारा
सांगली
गोंदिया
चंद्रपूर
कोल्हापूर


हेही वाचा – लोकल प्रवासासाठी लससक्तीचा निर्णय मागे घेण्यास राज्य सरकारचा हायकोर्टात स्पष्ट नकार