घरCORONA UPDATEMaharashtra New Guidelines: सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा संपूर्ण नियम

Maharashtra New Guidelines: सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा संपूर्ण नियम

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने चित्रपट, नाट्यगृह सुरु करण्यास तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचसोबत आता २२ ऑक्टोबरपासून राज्यातील खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रमही नियम पाळून आयोजन करण्याची परवानगी असणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने यासंदर्भात एक नवी नियमावली जाहीर केली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीची नियमावली

१) कार्यक्रमाला प्रवेश करण्याआधी शरीराचं तापमान तपासणं बंधनकारक

- Advertisement -

२) बंदिस्त सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी

३) कार्यक्रमावेळी ६ फुटांचे सामाजिक अंतर राखणे बंधनकारक

- Advertisement -

४) कार्यक्रमास उपस्थित आयोजक, प्रेक्षकांना मास्क घालणे बंधनकारक

५) बाल कलाकारांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक

६) गर्दी नियंत्रणासाठी आयोजकांकडे सुरक्षा व्यवस्था असावी

७) खुल्या जागेत कार्यक्रम असताना खाद्यपदार्थ, पेय विक्री करण्यास बंदी

८) कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नाही.

९) तंबाखूजन्य पदार्थ, नशा आणणारे पदार्थांचे सेवन करणे किंवा बाळगण्यास मनाई

१०) रंगभूषाकारांनी कार्यक्रमात पीपीई किट परिधान करणे बंधनकारक

११) मैदान, रस्ता, किंवा सभागृह अशा ठिकाणी उभे राहण्यास किंवा बसण्याकरिता मार्किंग असावे.


देशात कोळसा संकटाची ‘ही’ आहेत कारणे

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -