घरCORONA UPDATEराज्यात लवकरच पुन्हा सुरु होणार दारू विक्री - नवाब मलिक

राज्यात लवकरच पुन्हा सुरु होणार दारू विक्री – नवाब मलिक

Subscribe

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी निर्णय घेण्याची शक्यता... ऑनलाईन बुकिंग करुन होम डिलिव्हरी करण्याचा विचार

राज्य सरकारला तातडीने पैसे मिळवून देणार्‍या व्यवसायांना प्राधान्याने सुरू करावे. त्यासाठी दारूची दुकाने सुरू करावीत, बांधकाम, पायाभूत सुविधा, या व्यवसायांना गती द्यावी, आणि सरकारने सुरू केलेल्या पायाभूत प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत, अशा शिफारशी राज्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी काय करावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञांच्या अभ्यासगटाने केल्या आहेत. हा अहवाल शुक्रवारी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांना देण्यात आला आहे. त्यानंतर, आता कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांनीही राज्यात लवकरच दारुविक्री सुरु होईल, असे सांगितले आहे. दारूची ऑनलाईन बुकींग, होम डिलिव्हरी अशा पर्यायांचा अवलंब करण्यात येईल, असेही मलिक म्हणाले.

राज्याची अर्थव्यवस्था रूळावर कशी आणायची यासाठीचा हा अहवाल आहे. त्यात टप्प्या टप्प्यानी आर्थिक घडामोडी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव, चाकण आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतींचा अपवाद वगळता राज्यातले बहुतांश औद्योगिक परिसर कंटेनमेंट झोनच्या बाहेर आहेत. त्यामुळे इतर भागांत मुलभूत नियम पाळून औद्योगिक परिसर तातडीने सुरू करावेत, ज्या कंत्राटदारांचे पैसे थकित आहे ते लगेच त्यांना देण्यात यावेत, असेही या समितीने म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने दारुविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने दारुविक्री बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता, लवकरच ऑनलाईन दारुविक्री सुरु करण्याचा विचार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

राज्यात दारुबंदी आहे, तरीही अवैध मार्गाने दारुची विक्री होतच आहे. राज्य सरकारने दारुची दुकाने उघडण्याची परवानगी दिल होती. मात्र, पहिल्याच दिवशी ज्याप्रमाणे दारु दुकानांवर गर्दी पाहायला मिळाली, १९७५ नंतर दारुच्या दुकानांना राज्यात परवानगी देण्यात आली नाही. परिणामी, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, दारु दुकाने कमी आहेत. त्यामुळेच दारुच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. राज्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असल्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दारुची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला. त्यानंतर, आता राज्यात दारुची होम डिलिव्हरी किंवा ऑनलाईन बुकिंग करुन, ठराविक वेळेची मर्यादा घालून दारुविक्री सुरू करण्याचा विचार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील विविध जिल्ह्यातील स्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्याचा विचार सुरु असून लवकरच यासंदर्भात निर्णय होईल, असेही मुश्रिफ यांनी म्हटले. मुश्रिफ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -