घरताज्या घडामोडी'त्या' कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Subscribe

सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य केले.

सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य केले. तसेच, महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. (maharashtra government positive about old pension scheme cm eknath shinde)

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारचे कर्मचारी संप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर जाग झालेल्या राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोण दाखवल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात जुन्या पेन्शन योजनेबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याचे वक्तव्य विधानसभेत केले होते. त्यानंतर आता राज्य सरकार या योजनेबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी चांगले दिवस येणार आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली होती. राज्याचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली. या पेन्शन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर एक लाख 10 हजार कोटींचा बोझा पडेल. यातून राज्य दिवाळखोरीत निघेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते.


हेही वाचा – धक्कादायक! अमेरिकेतील सीएनएनपासून ते वॉशिंग्टन पोस्टपर्यंतच्या सर्व मीडियात कर्मचारी कपात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -