घरताज्या घडामोडीEid: बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना; सार्वजनिक ठिकाणी नमाजास बंदी

Eid: बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना; सार्वजनिक ठिकाणी नमाजास बंदी

Subscribe

बकरी ईद सणासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहे. त्यामुळे या सणांच्या कालावधीत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

देशात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशासह राज्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे उत्सवांच्या आनंदावर देखील विरजण पडले आहे. मात्र, नागरिकांना सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, बकरी ईद सणासाठीही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहे. त्यामुळे या सणांच्या कालावधीत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

- Advertisement -

सरकारने केलेल्या सूचना

  1. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
  2. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
  3. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
  4. प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
  5. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
  6. कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

सार्वजनिक ठिकाणी नमाजास बंदी

  • बकरी ईदच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी नमाजास बंदी घालण्यात आली आहे.
  • बकरे खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन प्रणाली
  • कंटेंटमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल.
  • बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्या वतीने ऑनलाइन प्रणाली स्थापित केली जाईल.
  • कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल.
  • देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही.
  • मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावले जाईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

    हेही वाचा – गोळ्या घ्या पण कामावर या… मधुमेही, ह्दयविकारग्रस्तांना एसटी महामंडळाची तंबी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -