घरCORONA UPDATE८ जुलैपासून राज्यातील हॉटेल्स सुरू करण्यास सरकारची परवानगी, पण...

८ जुलैपासून राज्यातील हॉटेल्स सुरू करण्यास सरकारची परवानगी, पण…

Subscribe

लॉकडाऊनपासून बंद असलेले हॉटेल्स अखेर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ८ जुलैपासून राज्यातील राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडण्यात येणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे, हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुखंयमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी या हॉटेल सुरू करण्याबबात चर्चा करण्यात आली होती. अखेर राज्यातील राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल्सबाबत सकारात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतला. राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे.

- Advertisement -

मात्र यासाठी हॉटेल्स मालकांना राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे.

यासाठी नियम पुढीलप्रमाणे

१. हॉटेलचीच्या क्षमतेच्या ३३ टक्के ग्राहकांना संमती दिली जाऊ शकते.

२. हॉटेलमध्ये फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे

३. ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे

४. रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे

५. हॉटेल्समधील गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत

६. ग्राहकांना मास्क आणि सॅनिटाझरचा वापर अनिवार्य


हे ही वाचा – निष्क्रीय मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडतच नाही; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -