घरमहाराष्ट्रनागपूरAjit Pawar VS Vijay Wadettiwar सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत; वडेट्टीवारांच्या...

Ajit Pawar VS Vijay Wadettiwar सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत; वडेट्टीवारांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले…

Subscribe

नागपूर : हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी होणाऱ्या आजच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. तसेच पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आता हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, चहा पान हे निमित्त असतं त्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय महत्त्वाचा आहे, ह्याची चर्चा करण्याकरता चहापाण्याचा कार्यक्रम असतो. परंतु त्यांनी बहिष्कार टाकलाय. वास्तविक चहापाण्याच्या कार्यक्रमाच्या ऐवजी पुढच्या वेळेस पानसुपारीचा कार्यक्रम ठेवण्याचा आमचा विचार आहे.

- Advertisement -

अधिवेशनमध्ये प्रामुख्यानी राज्य शासनातर्फे विदर्भाच्या आणि राज्यातल्या इतर प्रश्नांना म्हणजेच मराठवाड्याच्या प्रश्नांना जे प्रश्न खऱ्या अर्थानी नेहमी विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना आपण चर्चेला आणतो, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे. सभागृहात विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्या तर्फे मांडले जातील. त्या सर्व प्रश्नावर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा करून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे. असं अजित पवार म्हणाले.

दुष्काळ परिस्थितीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, या अधिवेशामध्ये मी पुरवण्या मागण्या मांडणार आहे. आधिवेशामध्ये जर कोणत्या मागण्या राहिल्या तर पुढील त्या प्रश्न संदर्भात सरकार भुमिका मांडेल. कापूस सोयाबीन तूर, धान, संत्रा आणि इतर पिकांबाबत आणि राज्यातील इतर भागातील विशेषतः अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळं झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं नुकसानग्रस्तांना आणि काही भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्या मागणीला योग्य न्याय देण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातनं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली होईल.

- Advertisement -

अजित पवार पुढे म्हणाले, विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा यांचं मोठे नुकसान झालेलं आहे. आपण १ लाख २० हजार कोटींचं कर्ज काढू शकतो, जो रेशो केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे एवढं कर्ज काढता येतं. असं असलं तरी ८० हजार कोटी कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. २०१३ मध्ये जीएसडीपीचं प्रमाण १६.३३ इतकं होतं. २०२३-२४मध्ये ते ३८ लाख कोटी होणार आहे. ही मोठी उपलब्धी असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

आर्थिक शिस्त महायुतीच्या सरकारनी पाळण्याचा काटेकोरपणे प्रयत्न त्याबाबतीमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळं विरोधी पक्षांनी जे पत्रामध्ये उल्लेख केलाय. वाढलेलं कर्ज ते नुसतं कर्जाचा आकडा सांगतात. परंतु त्याच्यातनं आपला राज्याचा नोमिनल GSDP हा अडतीस हजार कोटीपर्यंत म्हणजे तेरा, चौदाला सोळा हजार सोळा लाख कोटी तो अडतीस लाख कोटीपर्यंत म्हणजे किती पटीनं वाढलं ते आपण पण बघू शकता. अशा पद्धतीनं एकंदरीत आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असुन सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाचे आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही हे खेदाने म्हणावे लागते. जनतेचे प्रश्न सरकारला सोडवता न आल्याने सरकारी तिजोरीतून आपली पाठ थोपठून घेण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या योजनेद्वारे सुरु आहे. यामध्ये राज्य सरकार जनतेची कामे न करता जाहिरातबाजीवर भर देत आहे. “शासन आपल्या दारी” योजनेचा फोलपणा दिसून येत आहे. आपल्या सरकारची कामगिरी खोटी असून प्रसिध्दी मात्र मोठी आहे. राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन तेरा वाजले आहेत. चोर-चोर, भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -