Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात...

ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात…

Subscribe

जळगाव : शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगावमध्ये (Jalgaon) जाहीर सभा घेणार आहेत. याआधी ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. मात्र त्याआधी जळगाव महापालिका आयुक्तांना महाराष्ट्र शासनाचं पत्र आलं. या पत्रामुळे जळगावमध्ये राज्य सरकारकडून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी चर्चा आता रंगत आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Maharashtra Governments letter to Municipal Commissioner before Thackeray’s Jalgaon visit Sanjay Raut says)

हेही वाचा – मनोज जरांगेंच्या मागण्यांवर उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक; अजित पवारांनी दिली माहिती, आरक्षणाबाबत मार्ग निघणार?

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, जळगावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थती गंभीर करायची असेल, वाद निर्माण करायचे असतील तर सरकारकडून आडकाठी घालण्याचा प्रयत्न होईल. पण मला वाटत नाही, सरकारची अशी काही भूमिका असावी. कारण कुठल्यातरी एका उपसचिवांनी अशा प्रकारचं एक पत्रक काढलं आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे की, अशी पत्रक काढण्याआधी त्यांनी महापालिकेसंदर्भात नियम कायदे त्यांनी शिकून घ्यावेत. अशी पत्रक काढली असली तरी आम्ही त्याठिकाणी चाललो आहोत. हजारोच्या संख्यने त्याठिकाणी शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता जमणार आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. कारण थांबवण्याचा जे प्रयत्न करतात ते तोंडावर पडतात. त्यांनी जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर आज महाराष्ट्राच्या जनतेचं जनमानस काय आहे, हे त्यांना जळगावात गेल्यावर समजेल, असा इशरा संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला आहे.

हेही वाचा – बॅनर लावून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही त्यासाठी…; अजित पवार स्पष्टच बोलले

40 आमदारांची सुनावणी घेण्याचं 40 तासांचं काम 

- Advertisement -

16 अपात्र आमदारांवर अप्रत्यक्ष सुनावणी होणार आहे, पण या सर्व गोष्टीसाठी उशीर झाला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, खरं म्हणजे 40 आमदारांची सुनावणी घेण्याचं 40 तासांचं काम आहे. कारण प्रत्येकाने बेईमानी केली आहे. प्रत्येकाने एका पक्षातून निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात पक्षात्तर केलं आहे. घटनेमध्ये अशाप्रकारच्या फुटीला मान्यता नाही. याशिवाय त्याच्याकडे कोणतेही ठोस सबळ कारण नाही. परंतु विधानसभा अध्यक्षच फुटेल आहेत, त्यामुळे इतका वेळ लागत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा

न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, न्यायालयाचा स्पष्ट निर्देश आहे, सर्व आमदार अपक्ष ठरत आहेत. तरीसुद्धा विधानसभा अध्यक्ष आपल्या अधिकाराचा बावू करून हा वेळकाढूपणा करत असतील तर ते संविधानाशी, घटनेशी द्रोह करत आहेत, हे लक्षात घ्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -