घरताज्या घडामोडीसीबीआयला महाराष्ट्रात ‘नो इंट्री’

सीबीआयला महाराष्ट्रात ‘नो इंट्री’

Subscribe

ठाकरे सरकारने परवानगी काढली

महाराष्ट्र शासनाने एका अद्यादेशाद्वारे सीबीआयला राज्यात तपास करण्याची परवानगी काढून घेतली आहे. त्यामुळे सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आणि सीबीआय आमने-सामने आले आहेत. याआधी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने अशी भूमिका घेतलो होती.

सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तथापि, सीबीआयकडून राज्यात तपासाची परवानगी काढून घेण्यात आली असली तरी सध्या सुरू असलेली अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण आणि सीबीआयने टीआरपी घोटाळ्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या चौकशीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकारने सीबीआयला त्यांच्या अधिकार क्षेत्रातील केंद्रीय सरकारी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांची चौकशी करण्याची दिलेली परवानगी मात्र मागे घेण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने गृहखात्याकडून हा अद्यादेश काढण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -