घरमहाराष्ट्रराज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Subscribe

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज ( 18 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेकांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य आता निवडणुकीच्या निकालांकडे लागले आहे. आज सकाळपासूनचं मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासाठी हजारो पोलीस कर्मचारी तैनात आहे. यात संवेदनशील गावांमध्ये अधिकची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. यात पोलीस अधिकारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

विदर्भातील सर्वाधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान

एकट्या विदर्भात 2276 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे, दरम्यान आज सकाळपासूनचं मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली आहे.

नाशिकमध्ये 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये होणार निवडणुका

नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये आज निवडणुका पार पडणार आहे. एकूण 745 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया होत आहे. यात सदस्य पदासाठी 2897 तर सरपंच पदासाठी 577 उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

सिंधुदुर्गात 293 ग्रामपंचायतींसाठी मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतीपैकी 293 ग्रामपंचायतीसाठी 933 केंद्रांवर मतदान होणार आहे. सिंधुदुर्गातही आज सकाळपासूनचं मतदारांनी मतदान केंद्रावर येण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूरात 431 ग्रामपंचायतींसाठी मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. यात सरपंच पदासाठी 1 हजार 193 उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत.

सोलापूरमध्ये 1418 जागांसाठी मतदान

सोलापूरातील एकूण 189 ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये 1752 जागांवर निवडणूक होईल. यातील 329 बिनविरोध निवडणून आल्याने, उर्वरित 1418 जागांसाठी मतदान प्रक्रिया होईल.

अमरावतीत 257 ग्रामपंचायतींची निवडणूक

अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 14 तालुक्यांत निवडणुक होत आहे. यासाठी
2 हजार 97 पदांसाठी 4 हजार 796 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 257 सरपंचपदासाठी तब्बल 1279 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नागपूरात 236 सरपंचपदांसाठी 761 उमेदवारांत झुंज

नागपूर जिल्ह्यात एकूण 236 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. यात 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. तर 236 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 2054 सदस्य पदासाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे.

अहमदनगर15 सरपंच बिनविरोध

अहमदनगर जिल्ह्यात 1965 सदस्यांपैकी 301 सदस्य बिनविरोध झाले, तर 15 सरपंच बिनविरोध झाले. जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत,म्हणजे जिल्ह्यात एकूण 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 203 पैकी 190 ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.

बीडमध्ये 670 सरपंचपदासाठी 1 हजार 932 उमेदवार रिंगणात

बीडमध्ये 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रामपंचायतींसाठी आ मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत.


मुंबई महापालिका क्षेत्रात हरित जागांची माहिती देणारा ‘डॅशबोर्ड’ लवकरच

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -