घरमहाराष्ट्रMaharashtra Gram Panchayat: ७३ वर्षांचा अपराजित योद्धा; १० वेळा लढले अन् १०...

Maharashtra Gram Panchayat: ७३ वर्षांचा अपराजित योद्धा; १० वेळा लढले अन् १० वेळा जिंकले

Subscribe

राज्यात अनेक सत्तरी पार केलेले नेते आहेत. त्यातल्या काही मोजक्याच नेत्यांना राजकीय सत्ता मिळवण्यात किंबहूना सत्ता कायम राखण्यात यश आलं आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्याची किमया करणाऱ्या ७३ वर्षीय नेत्याची चर्चा सुरु झाली आहे. हा नेता १० वेळा निवडणूक लढला आहे आणि १० वेळा निवडून आला आहे. हरिद्वार चंद्रभान खडके असं या ७३ वर्षांच्या अपराजित योद्ध्याचं नाव आहे. हरिद्वार चंद्रभान खडके यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आतापर्यंत १० वेळा निवडणूक लढवली आहे. यंदाची त्यांची दहावी पंचवार्षिक निवडणूक होती. या निवडणुकीत त्यांना मतरुपी लोकांनी आशीर्वाद दिले आहेत.

हरिद्वार चंद्रभान खडके हे ७३ वर्षीय राजकीय योद्धे गावाच्या राजकारणात सक्रिय आहेत. गेली ४५ वर्ष सावरगड गावात ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच आणि सरपंच अशा विविध पदांवर काम केलं आहे. तरुणांनीही लाजवेल अशी कामं हरिद्वार खडके करत आहेत. वयाच्या ७३ व्या वर्षीही निवडणूक लढवली आणि जिंकली. हरिद्वार हे १९७२ पासून सतत ९ वेळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि विजयी देखील झाले. पंचक्रोशीत ७३ वर्षांचा अपराजित योद्धा अशी त्यांची ओळख आहे. यंदा दहाव्यांदा ते निवडणूक लढले आणि निवडणूक जिंकत अपराजित राहण्याचा मान राखला आहे.

- Advertisement -

हरिद्वार चंद्रभान खडके यांची राजकीय कारकीर्द

हरिद्वार चंद्रभान खडके यांनी १९७२ ला पहिल्यांदा निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी झाले आणि थेट उपसरपंच झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीची प्रत्येक निवडणूक लढली आणि जिंकत राहिले. १९७२ ते २०२० या काळात २० वर्ष सरपंच, १५ वर्ष उपसरपंच आणि २ वेळा पंचायत समिती सदस्य देखील झाले आहेत.


हेही वाचा – Maharashtra Gram Panchayat: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -