घरताज्या घडामोडीMaharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमध्ये भाजपला धक्का; शिवसेनेने मारली बाजी

Maharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमध्ये भाजपला धक्का; शिवसेनेने मारली बाजी

Subscribe

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या मतमोजणी होत असून भाजप आणि चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्राकंत पाटलांच्या मूळगावी खानापूरमध्ये भाजपला धक्का देत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांच्या गटाला ९ पैकी ६ जागांवर विजय मिळविण्यात यश आलं आहे. अजून तीन जागांचे निकाल लागणं बाकी आहे. खानापूरमध्ये शिवसेनेविरोधात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रावादी एकत्र येऊन लढली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी करुनही भाजपला पराभव पत्कारावा लागला. राष्ट्रवादीतील मोठा गट आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेत गेल्याने शिवसेनेची बाजू भक्कम झाली. गेल्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गेल्यावेळेस विनंतीवरुन खानापूरमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली होती. मात्र, यावेळेस वेगळच चित्र पाहायला मिळालं. खानापूर गावात प्रकाश आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली. मात्र, प्रकाश आबिटकर गटाने ६ जागांवर बाजी मारली.

- Advertisement -

चंद्रकांत पाटलांच्या गावी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी

स्थानिक पातळीवरचं राजकारण खूपच गुंतगुंतीचं असतं. याचं उत्तम उदाहरण चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या गावी पाहायला मिळालं. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत आघाडी केली. या आघाडीची चर्चा जोरदार सुरु होती. ही आघाडी शिवसेनेला पराभूत करेल असं वाटलं होतं. मात्र, शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत खानापूरमध्ये बाजी मारली आहे.


हेही वाचा – Maharashtra Gram Panchayat: पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का; कराडच्या शेनोली शेरेगावात भाजपचा विजय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -