घरताज्या घडामोडीMaharashtra Gram Panchayat: पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का; कराडच्या शेनोली शेरेगावात भाजपचा विजय

Maharashtra Gram Panchayat: पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का; कराडच्या शेनोली शेरेगावात भाजपचा विजय

Subscribe

राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी सुरु होताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला भाजपने धक्का दिला आहे. भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या कराड येथील शेनोली शेरेगावात जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, आज राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघातील शेनोली शेरेगावात भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. या निकालाने पृथअवीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. भाजप-अतुल भोसले गटाला १२ जागा तर अपक्ष १ जागा मिळाली.

- Advertisement -

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल

राज्यातील विविध भागातील ग्राम पंचायतींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होत आहे. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी १,५२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला. हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने पाडळी गावात विजय मिळवला.


हेही वाचा – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -