घरमहाराष्ट्रकार्तिकी एकादशीच्या महापूजेला अडथळे निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही - मुख्यमंत्री

कार्तिकी एकादशीच्या महापूजेला अडथळे निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही – मुख्यमंत्री

Subscribe

मुंबई : राज्यात कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांनी मिळतो. पण आपल्या राज्यात पहिल्यांदा दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आहे. यामुळे कार्तिकी एकादशीचा मान नेमका कोणाला मिळणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चेचा रंगली होती. पण पूजेला विरोध किंवा अडथळे निर्माण करण्याची आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची पंरपरा आहेत. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांला आहे. यामुळे कार्तिकी एकादशीच्या पूजेला विरोध करण्याचा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. यात कार्तिकी एकादशीच्या पूजेला विरोधाचा सूर लावू नये. यामुळे राज्याच्या परंपरेत खंड पाण्याचा किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासने देत आहे; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी नेमके कोण सहपत्नीक विठ्ठलाची पूजा करणार असा प्रश्न भाविकांनाच्या मनात पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजाला विरोध होत होता.

- Advertisement -

हेही वाचा – Arvind Kejriwal : राष्ट्रीय प्रकल्पग्रस्त अन् जाहिरातबाजीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले

आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचे जाहीर करावे – सकल मराठा समाज

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यात उपमुख्यमंत्र्यांनी महापूजेस यावे आणि विठ्ठल चरणी हात ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यास शंभर टक्के कटिबद्ध आहे, असे त्यांनी जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -