घरदेश-विदेशकोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ८१ टक्क्यांची वाढ

कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ८१ टक्क्यांची वाढ

Subscribe

भारतात सोमवारी कोरोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी १० लाखांवर गेला असूनही देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत ३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे देशातील सर्वात मोठी वाढ ही महाराष्ट्रात झाली असून ती तब्बल ८१ टक्के इतकी मोठी आहे.

सर्वाधिक रुग्णवाढ झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रामध्ये मागील २४ तासांमध्ये सहा हजार ९७१ रुग्ण आढळून आले असून ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मागील १२१ दिवसांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. पुण्यामध्ये रविवारी कोरोनाचे एक हजार १७६ नवे रुग्ण आढळून आले. तर सहा जणांनी कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात रविवारी प्राण गमावला. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८१ टक्क्यांनी वाढली आहे. २१ फेब्रुवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये महाराष्ट्रात ३६ हजार ६०६ रुग्ण आढळून आले.

- Advertisement -

सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असून त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरू असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -