घरमहाराष्ट्ररक्त संक्रमणातून एचआयव्ही होण्याचे महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाण

रक्त संक्रमणातून एचआयव्ही होण्याचे महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाण

Subscribe

रक्त संक्रमणातून एचआयव्ही होण्याचे महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाण असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

वेळेवर रक्त मिळाल्यानंतर गरजूचा जीव वाचू शकतो. पण, ते रक्त संक्रमित असेल तर? राज्यात रक्तपेढ्यांमधून उपलब्ध होणारे रक्त आजार विरहीत असल्याची खात्री देता येऊ शकत नाही. कारण, अनेकदा निष्काळजीपणामुळे रुग्णांना संक्रमित रक्त चढवले जाते. याचे प्रमाण जरी आता कमी झाले असले तरी एका माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, रक्त संक्रमणातून किंवा घटकांचा वापर केल्यामुळे राज्यात २०१८१९ या वर्षात १६९ रुग्णांना एचआयव्ही झाल्याचे समोर आले आहे.

देशात अशा केसेसमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमाकांवर

संक्रमित रक्तातून झालेल्या एचआयव्हीमध्ये राज्यात सर्वाधिक प्रमाण असल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे. रक्तातून होणारा एचआयव्ही या विषयी आरटीआय कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको) कडून माहिती मागवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, २०१८१९ या वर्षी संपूर्ण देशात संक्रमित रक्तातून १ हजार ३४२ रुग्णांना एचआयव्ही झाला आहे. २००१ या वर्षापासून आतापर्यंत संसर्गात ४७४ टक्के वाढ झाली आहे. देशातून अशा केसेसमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमाकांवर असला तरी पश्चिम भारतातून सर्वात जास्त अशा रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रेसर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – HIV बाधित रक्त दिलेल्या रक्तदात्याचा आत्महत्येचा प्रयत्न


एकीकडे एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असले तरी रक्त संक्रमणातून एचआयव्ही होण्याचे प्रमाण वाढत जात आहे, अशी खंत तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे, सरकारने या प्रकरणाला गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. शिवाय, रक्तदान करत असताना दात्याची आणि रक्ताची तपासणी योग्य कर्मचाऱ्यांकडून होते का? रक्तपेढ्यांमध्ये कर्मचारी पूर्ण संख्येने आहेत का? कर्मचारी प्रशिक्षित आहेत का? याबाबतही साशंकता उपस्थित करण्यात आली आहे.

- Advertisement -

कुठे किती केसेस ?

महाराष्ट्र १६९
गुजरात १३९
राजस्थान ३०
गोवा ०१
दिवदमन ०१


हेही वाचा – धक्कादायक!! गरोदर महिलेला दिलं HIVबाधित रक्त


स्वैच्छिक रक्तदानाची गरज

रक्ताची गरज पडली की नातेवाईक धावपळ करतात. त्यामुळे, स्वैच्छिक रक्तदान करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. जेवढे स्वैच्छिक रक्तदान वाढेल तेवढ्या अशा समस्या कमी होतील. अनेकदा रक्ताच्या बदल्यात रक्ताची मागणी केली जाते. त्यातूनही अशा घटना घडू शकतात. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त रक्तसाठा होतो. त्यामुळे, अधिक रक्तसाठ्यामुळेही अशी परिस्थिती ओढावू शकते, असे ही सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकलेला नाही.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -