घरताज्या घडामोडीHOLI : विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर, यंदाची होळी निर्बंधमुक्त, सुधारित नियमावली...

HOLI : विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर, यंदाची होळी निर्बंधमुक्त, सुधारित नियमावली जारी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने होळी आणि धुळवडीवर काही निर्बंध लादले होते. होळी रात्री १० च्या आतमध्येच पेटवणे, ध्वनी प्रदूषण करु नये यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा दाखला दिला होता. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. यामध्ये राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे विरोधकांनी टीकास्त्र डागले होते. तसेच हिंदुसणांविरोधातील सरकार असल्याची टीका केली होती. भाजप, मनसे आणि इतर राजकीय पक्षांच्या टीकेनंतर राज्य सरकार बॅकफूटवर आले आहे. तसेच तात्काळ सुधारित नियमावली जारी करुन होळी निर्बंधमुक्त केली आहे. यंदाच्या होळी आणि धुळवडीवर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नाही. परंतु नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घ्यावी असा आवाहन राज्य सरकारडून करण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारडून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. विदर्भात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांकडूनही देण्यात आला होता.

- Advertisement -

राज्य सरकारची नवी नियमावली

होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. १७ मार्च, २०२२ रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच दि. १८ मार्च रोजी धूलिवंदन व २२ मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

- Advertisement -

होळी / शिमगा सणानिमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षीदेखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

जून नियमावली काय होती?

रात्री दहाच्या आत होळी करणे बंधनकारक केले आहे.
डीजे लावण्यास सक्त मनाई केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे लाऊड स्पीकर जोरात लावू नये.
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करू नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धूलिवंदनाच्या दिवशी एखाद्याला जबरदस्तीने रंग लावू नये. तसेच पाण्याचे फुगे ही फोडू नये.
महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे.


हेही वाचा : The Kashmir Files चित्रपट न पाहणाऱ्यांविरोधात २ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा कायदा करायला हवा, यशवंत सिन्हा यांचे वादग्रस्त ट्विट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -