घरताज्या घडामोडीMaharashtra Holi Guidelines 2022: होळी, धूलिवंदन साजरी करताना 'हे' नियम पाळा, अन्यथा...

Maharashtra Holi Guidelines 2022: होळी, धूलिवंदन साजरी करताना ‘हे’ नियम पाळा, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई

Subscribe

हिंदू धर्मातील अनेक सणांपैकी होळी आणि धूलिवंदन सण अनन्य-साधारण महत्त्व असणारा सण आहे. फाल्गुण मासच्या पोर्णिमेला होळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू सणांमधील सर्वांच्या आवडता सणांपैकी एक होळी आणि धूलिवंदन हा सण आहे. होळीला शिमगा असेही म्हटले जाते. अवघ्या काही दिवसांवर होळी आणि धूलिवंदन येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने नियमावली घोषित केली आहे. या नियमावलीतील नियमांचे पालन करून यंदा होळी आणि धूलिवंदन साजरी करायची आहे. नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे होळी आणि धूलिवंदन साजरा करण्यापूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली जरूर वाचा

देशभरात होळी, धूलिवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जातो. देशभरात विविध पद्धतीने होळी, धूलिवंदन साजरी केली जाते. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवता आले असले तरी अजूनही काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढता आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्याने होळी आणि धूलिवंदन साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना आणि दहावी, बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने नियमावली जाहीर केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारची होळी आणि धूलिवंदनासाठी नियमावली….

रात्री दहाच्या आत होळी करणे बंधनाकरक केले आहे.
डीजे लावण्यास सक्त मनाई केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे लाऊड स्पीकर जोरात लावू नये.
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करू नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धूलिवंदनाच्या दिवशी एखाद्याला जबरदस्तीने रंग लावू नये. तसेच पाण्याचे फुगे ही फोडू नये.
महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे.


हेही वाचा – Holi 2022 : ‘होळी’साठी वृक्षतोड करण्यास सक्त मनाई; वृक्षतोड केल्यास दंड आणि कैदेची शिक्षा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -