Maratha Reservation: संभाजीराजेंच्या दौऱ्यांवर गृह विभागाची पाळत ? गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Sambhaji Raje Chhatrapati appeal to sate and central government give reservation to the poor Maratha community

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सोलापूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोकण असा दौरा करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संपुर्ण भेटी गाठीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गृह विभागावर त्यांनी निशाणा साधला आहे. या संपुर्ण दौऱ्यांमध्ये आपल्यावर हेरगिरी आणि पाळत ठेवल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजेंच्या या आरोपाला गृह विभागानेही उत्तर दिले आहे. संभाजीराजे यांनी आरोप केला होता की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे ? अशा आशयाचे ट्विट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. या ट्विटला खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. तसेच हेरगिरीबाबतही गृहमंत्र्यांनी महत्वाचा असा खुलासा करत संभाजीराजे यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरही गृहमंत्र्यांनी महत्वाचा असा खुलासा केला आहे.

 

काय म्हणाले गृहमंत्री

छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे.