घरमहाराष्ट्र१२ वीच्या परीक्षांचे सुधारित मूल्यमापन धोरण व निकालाची तारीख लवकरचं जाहीर होणार,...

१२ वीच्या परीक्षांचे सुधारित मूल्यमापन धोरण व निकालाची तारीख लवकरचं जाहीर होणार, शासनाचा निर्णय जाहीर

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने १० वीनंतर १२ वीच्या परीक्षाही रद्द केल्या. त्याबाबतचा अधिकृत निर्णय आज राज्य सरकारने जाहीर केला आहे. यात बारावीच्या परीक्षांचे मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यापूर्वी बारावीच्या परीक्षांसंदर्भात झालेल्या एका बैठकीत वर्षा गायकवाड यांनी परीक्षांच्या मूल्यमापनाचे धोरण आणि एकंदरीत अंतिम निकाल कसा जाहीर होईल याची माहिती दिली होती. परंतु त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेत कोरोना संसर्ग पाहता देशातील सर्व बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर आज पुन्हा राज्याचा शालेय शिक्षण मंत्र्यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे सुधारित मुल्यमापन धोरण आणि निकालाची तारीख लवकरचं जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष राज्य मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येतील.

- Advertisement -

शासनाने जाहीर केल्या आदेश नेमके काय लिहिले आहे?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा आयोजित करण्यात येते. सन २०२०- २१ या शैक्षणिक वर्षासाठी सदर परीक्षा माहे जून 2021 मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व तद्अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे सन २०२०- २१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इ.12 वी च्या परीक्षेबाबत निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

- Advertisement -

कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता राज्यामध्ये विविध स्तरावर निर्बंध लादण्यात आले. या परिस्थितीत इयत्ता १२ वी च्या परीक्षेचे आयोजन करण्यासाठी सदर परीक्षेत मोठ्या प्रमाणातील परीक्षार्थी उपस्थित राहणार असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची हाक्यता नाकारता येत नाही. परिक्षार्थीच्या कुटुंबातील एखादा सदस्य कोरोना बाधित असल्यास त्या परिक्षार्थीने परीक्षेस उपस्थित राहिल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या परीक्षार्थींनाही संसर्ग होण्याचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे परिक्षार्थी हे कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. अशा प्रकारच्या परीक्षा टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इयत्ता १२ वी च्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. या अनुषंगाने राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचे हित लक्षात घेता, शासनाने निर्णय घेतला आहे.

सन 2020-21 या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक 202106111 720454121 असा आहे.


Malad building collapse : मालाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -