बुधवारी दुपारी लागणार बारावीचा निकाल, ‘या’ वेबसाईटवर तपासा तुमचे गुण

hsc result

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, निकाल केव्हा लागणार याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. अखेर उद्या  निकाल जाहीर होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच,  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली. (Maharashtra HSC Result 2022 LIVE: HSC Results date, time, list of websites, toppers, passing criteria and more)

मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यापासून निकाल प्रक्रिया सुरू करण्यात आली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व विभागीय मंडळांचे निकाल राज्य मंडळाकडे जमा करण्यात आले होते. त्यानुसार, उद्या ८ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे.


या वेबसाईटवर तपासा निकाल

  • https://msbshse.co.in
  • hscresult.mkcl.org
  • mahresult.nic.in

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर https://www.mahahsscboard.in/ निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा – बारावीचा निकाल लागल्यानंतर काय कराल? Rechecking, पुनर्परिक्षेसाठी कुठे अर्ज कराल?

निकाल पाहून झाल्यावर काय कराल?

निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाच्या दोन प्रतीच्या प्रिंट्स काढून घ्या. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी याप्रति उपयोगी येतात.