बारावीचा निकाल लागल्यानंतर काय कराल? Rechecking, पुनर्परिक्षेसाठी कुठे अर्ज कराल?

ऑनलाईन निकालानंतर गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणापत्रासाठी कुठे अर्ज करावा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शंका असते.

hsc result date declare

इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच, www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ट महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील. (Maharashtra HSC Results 2022 Date: How to apply for rechecking, re-exam and copy of mark sheet, answer sheet)

Rechecking कसे कराल?

अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत शंका असते. अशावेळी त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पडताळणी केली जाते. त्यासाठी ऑनलाईन निकालानंतर गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणापत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून http://verification.mh-hsc.ac.in अर्ज करावा लागेल.

गुणपडताळणीसाठी शुक्रवारी १० जून ते सोमवारी २० जूनपर्यंत तसेच, छायाप्रतीसाठी शुक्रवारी १० जून ते २९ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा – बुधवारी दुपारी लागणार बारावीचा निकाल, ‘या’ वेबसाईटवर तपासा तुमचे गुण

हे लक्षात ठेवा!

पुनर्मूल्यांकनासाठी (Rechecking) ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत तुम्ही पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुन्हा परीक्षा देऊ शकतात. यासाठी ते शुक्रवारी १२ जूनपासून अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

गुणपत्रिका केव्हा मिळणार?

ऑनलाईन निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका महाविद्यालयात १७ जून रोजी दुपारी ३ वाजता वितरीत करण्यात येणार आहेत.