घरमहाराष्ट्रराष्ट्रपती राजवटीत माहिती विभागाची टूर निघाली इस्रायलला - मुंडेंची टीका

राष्ट्रपती राजवटीत माहिती विभागाची टूर निघाली इस्रायलला – मुंडेंची टीका

Subscribe

राज्यात राष्ट्रपती राजवट आणि शेतकऱ्यांची नाजूक परिस्थिती असताना सरकारी अधिकाऱ्यांनी परदेश दौरे करु नयेत, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर असून सततचा दुष्काळ आणि त्यानंतर आता अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकाऱ्यांचा परदेश दौऱ्यामुळे होणारी उधळपट्टीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी हरकत घेतली आहे. मुंडे यांनी हा दौरा रद्द करावा, अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे त्यांनी केली आहे. एकीकडे सत्ता स्थापनेचा गुंता वाढल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यात अगोदरच राज्यभरात शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक ओल्या दुष्काळाने गेले आहे. या अस्थिर परिस्थितीत अगोदरच डबघाईला आलेल्या माहिती व जनसंपर्क विभागातील २ संचालक आणि ५ वरिष्ठ अधिकारी अभ्यास दौऱ्याचे कारण देत इस्रायल दौऱ्यावर निघाले असून या अधिकाऱ्यांपैकी काही जणांवर न्यायालयात प्रलंबित खटले आहेत, तर काही जण परिविक्षाधीन कालावधीत सेवेत आहेत, असा आरोप मुंडे यांनी केला आहे.

राज्याचा माहिती व जनसंपर्क हा विभाग नेहमी मुख्यमंत्री यांच्या अधिपत्यात राहिलेला आहे. शासनाच्या योजना आणि नवनवीन उपक्रम इत्यादींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माहिती जनसंपर्क विभागावर असते. शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती आणि राजकीय अस्थैर्य पाहता नियम धाब्यावर बसवून अभ्यास दौऱ्याचे नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी करत इस्रायल दौरा करणे संयुक्तिक आहे का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे हा दौरा रद्द करावा अशी मागणीही केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती राजवटीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी गरीब रुग्णांना दिलासा देण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहत विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -