राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत आज आगामी हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत आज आगामी हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (maharashtra is falling behind because of one mans monstrous ambition aaditya thackeray attacked cm eknath shide)

“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. उदय सामंत यांना उद्योग मंत्री म्हणून काम करताना मी कधीच पाहिलेलं नाही. राज्य सरकारने त्यांना या संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर ठेवलेलं आहे. ज्यांचा या खात्याशी संबंध नाही ते का उत्तर देत आहेत. ज्यांना मी प्रश्न विचारले, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी आव्हान दिलेलं आहे. तुम्ही मंचावर बसा, मीडियासमोर आणि माझ्यासमोर डिबेट करा,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

काल पत्रकार परिषदेत समोर आणलेलं पत्र एमआयडीसीने वेदांता-फॉक्सकॉनला लिहिलेलं होतं. तर एमओयू कशाचा साईन करणार होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री त्यांना का भेटले याचं उत्तर त्यांनी द्यावं. सगळं काही ठरतं तेव्हा एमओयू साईन करतो. एमओयूनंतरच कॅबिनेटची नोट तयार होऊन ती केंद्र सरकारकडे जाणार आहे. म्हणजे हे खोके सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री सोडून सगळे यावर बोलत आहेत. उद्योग मंत्र्यांना यातून बाहेर ठेवलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र द्वेष सुरु आहे. एकीकडे या सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्याच प्रसंगाची तुलना ही शिवाजी महाराजांसोबत केली जाते. यातून महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यांची तुलना महाराजांबरोबर करण्याचा हा प्लॅन आहे आणि त्यामधूनच अशा पद्धतीची वक्तव्य येतात असं मला असं वाटतं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

गोवरमुळे १२ मुलांचा मृत्य झाला, तरी अद्याप कोणत्याही मंत्र्याकडून अजून एकही बुलेटीन आलेले नाही. कोरोनाच्या काळात आम्ही दररोज एक बुलेटीन देत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांशी संवाद साधत होते. या गोवरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडूनही एक नोटीस आली आहे. या नोटीसमध्ये काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण अशी नोटीस कधीच कोरोनाच्या काळाता केंद्राकडून आली नव्हती.


हेही वाचा – गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार; आरोग्यमंत्री सावंतांची माहिती