जयदत्त क्षीरसागरांचा अखेर भाजप उमेदवाराला पाठिंबा; राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंसमोर मोठं आव्हान

maharashtra jaidatta kshirsagar supports bjp candidatein marathwada teacher constituency election

शिवसेनेतील निलंबित ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मराठा शिक्षक संघ निवडणुकीत अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे. यावरून आता जयदत्त क्षीरसागर आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण आता जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी किरण पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागून आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार बाजी मारणार यावरही चर्चा रंगत आहेत. या मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेनेतील निलंबित नेते जयदत्त क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष होतं. मात्र अखेरच्या क्षणी क्षीरसागरांनी आपला पाठिंबा भाजप उमेदवार किरण पाटील यांना दिला आहे.

या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा शनिवारी थंडावल्या. शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी काल दिवसभर सभा, मेळावे आणि गाटीभेटी घेत शक्तीप्रदर्शन केलं. या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदार होणार आहे.

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने जयदत्त क्षीरसागर यांची  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. याबाबत बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी घोषणा केली होती. मात्र तेव्हापासून क्षीरसागर ठाकरे गटावर नाराज होते. अखेर त्यांनी मराठवाडा निवडणूकीत भाजपला जाहीर पाठींबा देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.


उत्तर प्रदेशच्या तरुणाचे मुंबईत धर्मांतर; पोलीस चौकशी सुरु