कर्नाटक सरकारचा निषेध! महाराष्ट्रात शिवसेना, मनसेकडून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने

maharashtra karnataka border dispute live karnataka buses black painted after belgaum incident by shiv sena mns ncp in maharashtra today

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यात मंगळवारी कर्नाटकातील बेळगावमध्ये कन्नड रक्षक वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांना अडवत त्याची तोडफोड केली, त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळत चालला आहे. महाराष्ट्र सरकारने या वादावर तोडगा काढण्यासाठी शंभुराज देसाई आणि चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, या समितीमार्फत हे दोन्ही मंत्री कर्नाटकात जाणार होते. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सुरक्षेचे कारण देत या दोन्ही मंत्र्यांना कर्नाटकात न येण्याचे धमकी वजा आवाहन केले. त्यामुळे या वादाचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. (maharashtra karnataka border dispute live karnataka buses black painted after belgaum incident by shiv sena mns ncp in maharashtra today)

दरम्यामन आज सकाळपासून कर्नाटक पोलिसांकडून सीमेवर महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या अनेक वाहनांना अडवलं जात आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या मुजोरीविरोधात आता महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यात अनेक ठिकणी विविध राजकीय पक्ष कानडी मुजोरांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. राज्यातील नवी मुंबई, औरंगाबाद, बारामती आणि नाशिकमध्ये कर्नाटकच्या बसेसला काळं फासत कर्नाटकातील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील कर्नाटक परिवहनच्या बसेसला शिवसैनिकांनी काळ फासत, जय महाराष्ट्र लिहून कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, यानंतर आता बस स्थानकावर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. याशिवाय नवी मुंबईतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी कळंबोली महामार्गावरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी वाहनांवर काळ्या अक्षरात मनसे असं लिहित कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.

दरम्यान नाशिकमध्येही कर्नाटकच्या घटनेते पडसाद उमटले. नाशिकमध्ये शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात काही संघटनांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी संतप्त आंदोलकांना कर्नाटकच्या बसेसला काळ फासत कर्नाटकात मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाचा निषेध केला. याशिवाय पुण्यातील बारामतीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या वाहनांना अडवक आणि काळं फासत कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र कर्नाटकमधील पेटता सीमा संघर्ष वाहता आज विरोधी पक्षनेते अजित पवार दुपारी ४.०० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरातून कर्नाटकात सौंदत्तीत रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेलेल्या मराठी भाविकांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता आहे.


सीमासंघर्ष थांबवण्यासाठी केंद्राने लक्ष घालावं; राज ठाकरेंचा बोम्मईंनाही इशारा