आताच्या पैलवानांमध्ये हा वेगळा गुण आहे – बाळारफीक शेख

दर्जेदार मल्ल घडवून कुस्तीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख याने व्यक्त केले.

Maharashtra Kesari Bala Rafiq
महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख

पूर्वीच्या पैलवानांना व्यायामाशिवाय जास्त काही समजत नसल्याचा अनेकांचा समज होता. परंतु आताच्या पिढीतील पैलवान शरीराच्या सुदृढतेसोबत बुध्दीनेही हुशार आहेत. दर्जेदार मल्ल घडवून कुस्तीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख याने व्यक्त केले. आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

बालारफीक शेख यांनी असे सांगितले की, सराव करताना प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार डोके शांत ठेवून कुस्तीत संयमाने खेळ खेळलो. खेळामध्ये हार-जीत होतच असते. एकदा हरलो म्हणजे सर्व काही संपले असे नाही. आपल्याला नुरा कुस्ती माहिती नाही. मातीवरील आणि गादीवरील कुस्तीमध्ये थोडासा फरक असून गादीवरील कुस्तीमध्ये जोडी चपळता दाखवावी लागते. सद्यस्थितीत वस्ताद जास्त आणि कुस्ती खेळणाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत असून दररोज दीड-दोन हजारांचा खर्च होत आहे. कुस्तीगीरांच्या परंपरेचा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांचा विचार करता राज्यात जिल्हा आघाडीवर आहे.