घरमहाराष्ट्रपुणेMaharashtra Kesari : सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरीचे मैदान मारले; जल्लोषात उचलली चांदीची गदा

Maharashtra Kesari : सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरीचे मैदान मारले; जल्लोषात उचलली चांदीची गदा

Subscribe

मराठमोळा खेळ म्हणजे कुस्ती स्पर्धा. या कुस्ती स्पर्धेतील मानाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी.

पुणे : लाल मातीत रांगड्या पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धेतील मानाची कुस्ती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी. याच महाराष्ट्र केसरीचे यंदाचे मैदान सिंकदर शेखने मारले. शुक्रवारी (10 नोव्हेंबर) रोजी झालेल्या अंतिम सामन्यांत सिंकदरने गतविजेत्या शिवराज राक्षेला चितपट केले. त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरीवर सिंकदर शेखचे नाव कोरल्या गेले आहे.(Maharashtra Kesari  Sinkadar Shaikh kills Maidam of Maharashtra Kesari A silver mace lifted in jubilation)

मराठमोळा खेळ म्हणजे कुस्ती स्पर्धा. या कुस्ती स्पर्धेतील मानाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी. यंदा ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत ही सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. यामध्ये सिंकदर शेखने बाजी मारली.

- Advertisement -

राज्यातील 42 संघानी घेतला स्पर्धेत सहभाग

पुणे जिल्ह्यातील फुलगावात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा राज्यातील 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकुण 42 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गादी विभागात 10 आणि माती विभागात 10 असे 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग होता. साधारण या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर सहभाग घेतला होता.

हेही वाचा : वाढत्या प्रदूषणाचा परिणाम; फटाके फोडण्याच्या वेळेत आता एका तासाची घट

- Advertisement -

सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

2023 चा महाराष्ट्र केसरीचे मैदान मारणारा सिंकदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील रहिवासी आहे. सिकंदरला त्याच्या आजोबांपासूनच कुस्तीचा वारसा मिळालेला आहे. त्या वडिलांना गरिबीमुळे कुस्ती सोडून हमालीचं काम करावं लागलं होतं. दरम्यान 2022 ची महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने पटकावली होती. त्याने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव केला होता. पण त्याही वर्षी चर्चा होती ती सिंकदर शेख याचीच.

हेही वाचा : रोहित शर्मा नाकारत होता कर्णधारपद पण…; गांगुलीने सांगितली ‘ती’ इनसाइड स्टोरी

अखेर मैदान मारलेच…

2022 ची महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने पटकावली होती. त्याने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव केला. दरम्यान, या लढतीआधी महेंद्र आणि सिकंदर शेख यांच्यात झालेल्या कुस्तीची चर्चा झाली होती ती म्हणजे महेंद्र गायकवाडला दिलेल्या गुणांवरून पंचांसह आयोजकांवर आरोप करण्यात आले होते. असे जरी असले तरी यंदा 2023 मध्ये सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरीचे मैदान मारलेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -