गेल्या आठवड्यामध्ये पुण्याजवळील पुलगाव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. त्यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरूध्द सिकंदर शेख अशी लढत झाली. 23 सेकंदात आक्रमक कुस्ती करून पैलवान राक्षे याच्यावर झोळी डावाने मात करून पैलवान शेख याने मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकाविला. सिकंदर शेखने गतवर्षीचा वचपा काढत यंदा ही महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवला. यामुळे मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचले.
मोतोश्रीवर जाऊन सिंकदरने उध्दव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर सिकंदरने माध्यामांशी बोलताना उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले. उध्दव ठाकरेंना भेटून खूप छान वाटलं, त्यांनी पाठीवर शाबासकी दिली. तसेच, तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काही अडचण असेल तर मला सांग, असं सांगितले.
आत्तापर्यंत ६ मिनिटांपर्यंत ही कुस्ती चालली आहे. पॉईंटवर ही कुस्ती चालायची आणि निकाली ठरायची. तू चितपट करुन केवळ २२ सेकंदात अंतिम लढत जिंकल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, असेही सिकंदरने म्हटले. माझ्या पुढील महिन्यात कॉम्पिटीशन्स आहेत, मी बाहेरही लढणार आहे. मी हिंद केसरीसाठीही लढणार असल्याचं सिकंदरने सांगितलं.
‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदरने घेतली आव्हाडांची भेट
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत, मानाची “महाराष्ट्र केसरी” स्पर्धा जिंकणारे मल्ल सिकंदर शेख यांनी आज माझ्या घरी भेट दिली.गेल्या वर्षीच सिकंदर महाराष्ट्र केसरी झाले असते.परंतु वादग्रस्त निर्णयाचा ते बळी ठरलें.पण यावेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्याला कोणतीच संधी न देता अवघ्या 23 सेकंदात अस्मान दाखवले.
येणाऱ्या काळात ते भारताच प्रतिनिधीत्व ऑलिंपिक मध्ये करतील याची खात्री आहे. आणि यासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्याचा शब्द मी त्यांना दिला आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारला,सिकंदर शेख यांना शासकीय सेवेत समविष्ट करून घ्यावे,अशी मागणी देखील केली आहे. सिकंदर यांना उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या.