घरताज्या घडामोडीनाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी

Subscribe

हर्षवर्धन सदगीर विरोधात शैलेश शेळके मध्ये पहिली लढत होती. यामध्ये पहिल्या तीन मनिटांत शैलेश शेळके १-० वर आघाडीवर होता. त्यानंतर १-१ अशी बरोबर झाली. पण नाशिकच्या पैलवानाने हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ असा पराभव केला. यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी हर्षवर्धन सदगीर ठरला असून त्याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे. या विजयानंतर त्याने आपल्या विरोधात खेळत असलेल्या शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन विजय साजरा केला. त्यामुळे खिलाडूवृत्ती दाखवतं त्याने मैत्रिचं दर्शन घडवलं आहे.

म्हाळुंगे बालेवाडीतून महाराष्ट्र केसरीचा थरार रंगला होता. यावेळी पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुलात कुस्ती प्रेमींची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या तालमीतले आहे. म्हणून माजी अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्यासाठीही हा विजय खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

- Advertisement -

पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. मात्र पंचांनी अति बचावात्मक कुस्ती खेळाल्यामुळे शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला होता. त्यानंतर दुसऱ्या डावा संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावला. त्यामुळे १-१ अशी बरोबरी झाली. पण शेवटच्या ३० सेकंदासाठी हा डाव रंगला होता. अखेरच्या १० सेकंदात डाव टाकतं महत्त्वाच्या दोन गुणांची कमाई हर्षवर्धने केली आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

#Live : कोण होणार महाराष्ट्र केसरी?

#Live : नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 7, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -