घरमहाराष्ट्रशाळाबाह्य मुलामुलींच्या संख्येत महाराष्ट्र पुढे; अंबादास दानवेंनी व्यक्त केली चिंता

शाळाबाह्य मुलामुलींच्या संख्येत महाराष्ट्र पुढे; अंबादास दानवेंनी व्यक्त केली चिंता

Subscribe

2022- 23 या शैक्षणिक वर्षात देशभरातील तब्बल 9 लक्ष 30 हजार 531 मुले-मुली शाळाबाह्य असल्याची बाब शासकीय आकडेवारीवरुन समोर आली आहे.

मुंबई – शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विचार प्रवाहांना सुयोग्य वळण मिळवून देण्याचे काम शिक्षण करत असते. इतिहास काळापासूनच महाराष्ट्र हे शिक्षणाचे माहेरघर राहिले आहे. मात्र या शिक्षणाच माहेरघर असलेल्या महाराष्ट्र राज्यात शाळाबाह्य मुलामुलींचे प्रमाण अधिक आहे. सुमारे 15 हजारांहून अधिक मुले-मुली शाळा बाह्य असल्याचे शासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र दानवे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठवले आहे. ( Maharashtra leads in number of out-of-school children; Ambadas Danve expressed concern)

हेही वाचा – HSC Result : बारावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, असा पाहा रिझल्ट

- Advertisement -

2022- 23 या शैक्षणिक वर्षात देशभरातील तब्बल 9 लक्ष 30 हजार 531 मुले-मुली शाळाबाह्य असल्याची बाब शासकीय आकडेवारीवरुन समोर आली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील मुलांचे प्रमाण अधिक असून 8 हजार 478 मुले आणि 7 हजार 228 मुली असे एकूण 15 हजार 707 जण शाळाबाह्य मुलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत उत्तर प्रदेश व बिहारप्रमाणे महाराष्ट्राची कामगिरी निराशाजनक असल्याची खंत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्यात या शाळाबाह्य मुलामुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायदा (आर.टी.ई.) समग्र शिक्षण योजना, बेटी बचाओ, बेटी बढाओ व माध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजना राबविल्या जात आहेत. तथापि, प्रत्यक्षात लाखो मुले-मुली औपचारीक शिक्षण प्रवाहातून बाहेर असल्याचे चित्र उपरोक्त आकडेवारीवरुन स्पष्ट होते. यातून या योजनांचा फोलपणा दिसून येत असल्याची टिका विविध शिक्षण तज्ञांसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच सदर बाब ही शिक्षणाचे माहेरघर असलेल्या आपल्या राज्यासाठी चिंताजनक असल्याचे दानवे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ही वस्तुस्थिती लक्षात घेता शाळा बाह्य मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणून शैक्षणिक क्षेत्रात राज्याला अग्रगण्य करावयाचे असल्यास शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असून त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना आपण प्राधान्याने कराव्यात असे अंबादास दानवे यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -