घरताज्या घडामोडीMaharashtra Winter Assembly Session 2021 Live: विधानसभा कामकाज संपले, उद्या सकाळी ११...

Maharashtra Winter Assembly Session 2021 Live: विधानसभा कामकाज संपले, उद्या सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होणार

Subscribe

विधानसभा कामकाज संपले, उद्या सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होणार


विधान परिषदेचे कामकाज स्थगित, उद्या दुपारी १२ वाजता नियमित कामकाज सुरू होणार

- Advertisement -

विधान परिषदेचे कामकाज पुन्हा सुरू


विधान परिषदेचे कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी तहकूब

- Advertisement -

विधान परिषदेचे कामकाज पुन्हा सुरू


विधान परिषदेचे कामकाज सुरू


नक्कला केल्या नाहीत, असंसदीय शब्द वापरला नाही, तरीही मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो – भास्कर जाधव


विरोधकांनी जरुर हक्कभंग आणवा – भास्कर जाधव


सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी बिनशर्त माफी मागतो – भास्कर जाधव


माझ्याकडून कळत नकळतपणे हातवारे होतात, हलण होत – भास्कर जाधव


भास्कर जाधव यांच्याविरोधात मी हक्कभंग आणणार – फडणवीस


नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी १५ लाखांचे आश्वासन दिले – भास्कर जाधव


फडणवीस यांनी शब्दच्छल केला – भास्कर जाधव


भास्कर जाधवांच्या नक्कलांवरून भाजप आक्रमक


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणीही कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचा अपमान करू नये असे आवाहन केले


जे घडले ते चुकीचे आहे, भास्कर जाधवांनी माफी मागितली पाहिजे – फडणवीस


तालिका सदस्य कुणाल पाटील अध्यक्षांच्या खुर्चीवर


विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब, मुख्यमंत्री ठाकरेंची अनुपस्थितीच


विधानपरिषदेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब


विधानसभेचे कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी तहकूब


विधानसभेचे कामकाजाला पुन्हा सुरुवात


भास्कर जाधव यांच्या नक्कलांनंतर विधानसभेत गोंधळ, पुढील कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित


अंगविक्षेप परत घेता येतो का?, फडणवीसांचा सवाल


मी कोणताही असंसदीय शब्द वापरला नाही – भास्कर जाधव


माझे अंगविक्षेप मागे घेतो आणि शब्दपण मागे घेतो – भास्कर जाधव


भास्कर जाधवांवर कारवाई करा, नाहीतर माफी मागा – फडणवीस


भास्कर जाधवांना लाज वाटायला पाहिजे – फडणवीस


विरोधी पक्षांनी शब्दच्छल केला आहे – भास्कर जाधव


भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे विधानसभेत विरोधकांचा गदारोळ


भास्कर जाधवांनी माफी मागा – फडणवीस


पंतप्रधानांचे अंगविक्षेप करून सभागृहात बोलणे चुकीचे – फडणवीस


भास्कर जाधवांना सस्पेंड करा, पंतप्रधानांची नक्कल करणे चुकीचे – फडणवीस


मोदींच्या १५ लाखांचं काय झालं?, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा सवाल


नितीन राऊतांनी सभागृहाची माफी मागावी – फडणवीस


मोफत वीज बिलावरून विधानसभेत गदारोळ


आरोग्य विभाग ‘ड’ ची परीक्षा पुन्हा घ्यायची झाल्यास विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे


विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही – राजेश टोपे


५ कंपन्यापैकी १ कंपनीची निवड करण्यात आली होती – राजेश टोपे


न्यासा कंपनीची निवड का झाली? यावर राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले.


विद्यार्थ्यांच्या आयुषाशी खेळ सुरू – प्रवीण दरेकर


परीक्षेतील गोंधळा प्रकरणी भाजपकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिली.

स्वतः आरोग्य विभागाने एफआयआर दाखल केला आहे – राजेश टोपे
कोणालाही पाठिशी घालणार नाही – राजेश टोपे
परीक्षा पद्धत बदलण्याचे काम घेण्यात येईल – राजेश टोपे


न्यासा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट का दिलं? दरेकरांचा सवाल


विरोधकांच्या सभात्यागानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शक्ती विधेयक विधानसभेत मांडले


अध्यक्षपद निवडीला पक्षाचा व्हीप लागू होत नाही – फडणवीस


विधानसभा अध्यक्ष निवडीवरून विरोधकांचा सभात्याग


विधानसभा अध्यक्षपदाच्या आवाजी मतदानाने होणार, हरकती नोंदण्याचा कालावधी फक्त एक दिवस


नियम बदलांना विरोधक एवढे का घाबरत आहेत – नवाब मलिक


नाना पटोलेंच्या घोडेबाजार शब्दावर मुनगंटीवारांकडून आक्षेप


विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नियम बदलण्याची गरज नव्हती – सुधीर मुनगंटीवार


विधानसभा अध्यक्षपदाची निवड नियमाप्रमाणे होते – नाना पटोले

घोडेबाजार थांबवा यामुळे आमची अशी भूमिका – नाना पटोले


विधानसभा अध्यक्षपदाच्या आवाजी मतदानाला विरोध


साठ वर्षांनंतर नियम बदलण्याची वेळ का आली – फडणवीस


सरकारचा आमदारांवर विश्वास नाही का? – देवेंद्र फडणवीस


विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून देवेंद्र फडणवीसांचा सवाल


काळ्या यादीतील जी.ए कंपनीला कंत्राट का?, मंत्रीमंडळापर्यंत पेपर फुटीचे संबंध – फडणवीस


परीक्षा घोटाळ्यासंदर्भात उद्या चर्चेला वेळ द्यावी – फडणवीस


नियुक्त्याकरिता पैसे द्यावे लागतात, ऑडिओ क्लिपही झालीय व्हायरल – देवेंद्र फडणवीस


आताच्या टीईटीच्या परीक्षेतील घोटाळा समोर आलाय. या राज्य सरकारच्या कार्यकाळात एकही परीक्षा घोटाळ्याविना नाही – फडणवीस


पेपर फुटीच्या चर्चेला वेळ द्यावा, फडणवीसांची मागणी

न्यासा कंपनीलाच संपूर्ण कामाची जबाबदारी दिली – फडणवीस


विधानसभेत फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल


पिकविमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले – देवेंद्र फडणवीस


पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस,

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली चौकशी


शिवाजी महाराज पुतळा विटंबनावरून शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थितीत केली.

  • महाराष्ट्र एकीकरण बरखास्त करण्याचा डाव

विधान परिषद काँग्रेसच्या सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी घेतली शपथ


विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रज्ञा राजीव सातव यांना शपथ दिली.


विधान परिषदेचे कामकाज सुरू


अधिवेशनात प्रत्येक सत्रात उपस्थितीत राहण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनाही व्हिप जारी केला, अशी माहिती शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांचा हल्लाबोल


विधानसभेत प्रश्नोत्तरे सुरू


संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी जितेश अंतापुरकर यांची ओळख करून दिली


विधानसभेत नवीन सदस्यांच्या परिचयाला सुरुवात


मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल भाजपकडून घोषणा


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक आहे. वेळेनुसार अधिवेशनात उपस्थितीत राहणार, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.


महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थितीत आहेत.


विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले.


महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि विधिमंडळ सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडीचे मंत्री आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.


मागच्या अधिवेशनात ज्या भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना विनंती पत्र पाठविण्यात आले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, वर्षा गायकवड, जयंत पाटील आदी महाविकास आघाडीतील सर्व मंत्री उपस्थितीत होते. विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मंत्र्यांनी जयघोष केला.


राज्याचा कारभार अस्थिर आहे, अशी प्रतिक्रिया विधीमंडळ परिसराबाहेर भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली.


सभापती कार्यालयातील २ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह


आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.


मुंबईत भाजप आमदारांची आज रात्री ८ वाजता बैठक होणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.


राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी सगळ्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यातील ८ पोलीस कर्मचाऱ्यांसह १० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जवळपास ३,५०० नमुने तपासले गेलेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


धनंजय मुंडे, छगन भुजबळ विधानभवनात पोहोचले.


उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात पोहोचले.


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. २८ डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या हिवाळी अधिवेशनाला उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची सकाळी ९ वाजता बैठक पार पडणार आहे. विधानभवनात होणाऱ्या बैठकीत अधिवेशनातील राज्य सरकारची व्यूहरचना ठरवली जाणार आहे. अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशनात २६ विधेयके मांडली जाणार आहेत. दरम्यान ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा अनेक मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याची तयार विरोधी पक्षाने केली आहे. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्ह दिसत आहेत. तसेच या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

काल, मंगळवारी झालेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने सह्याद्री अतिथिगृहात आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. ठाकरे यांनी दुरद्रूश्य प्रणालीद्वारे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -