घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत...

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live Update: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती

Subscribe

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती

- Advertisement -

विधानपरिषदेचे कामकाज सुरू


पुढील ५ मिनिटांसाठी विधानपरिषद तहकूब

- Advertisement -

विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर


अनिल परब आणि नितेश राणेंमध्ये हमरीतुमरी


विदर्भ मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरूच – देवेंद्र फडणवीस


भाजपमुळे ओबीसींचे आरक्षण गेले – नाना पटोले


ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी


विधान परिषदेचे कामकाज सुरू


विधान परिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब


विरोधकांकडून शक्ती कायद्याचं स्वागत


विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शक्ती कायदा विधेयक सादर केले


विधान परिषदेचे कामकाज सुरू


विधान परिषदेचे कामकाज स्थगित, ३ वाजता सुरू होणार


अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत आज संध्याकाळी ५ वाजता सर्व राजकीय प्रमुख नेत्यांची बैठक होणार, अजित पवार, अनिल परब, एकनाथ शिंदे उपस्थितीत राहणार


रातांधळेपणासारखा राजकीय आंधळेपणा आलाय – मुनगंटीवार


महापौरांना धमकी देणारा अद्याप का शोधू शकले नाहीत, मुनगंटीवारांचा सवाल


महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात आले – दिलीप वळसे पाटील


महापौरांना आलेल्या पत्रातील शब्दांचा निषेध – सुनील प्रभू


महापौरांचा अपमान हा मुंबईतील महिलांचा अपमान – सुनील प्रभू


महापौर किशोरी पेडणेकरांच्या जीवाला धोका – सुनील प्रभू


विधानसभेचे कामकाज सुरू


आशिष शेलारांवरून विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब


आशिष शेलारांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सभागृहात बोलता येणार नाही – फडणवीस


आशिष शेलारांच्या वक्तव्याचा निषेध – सुनील प्रभू


महापौर पेडणेकरांच्या बाबातीत केलेले वक्तव्य निदंनीय – सुनील प्रभू


अजून चार्जशीट दाखल झालेले नाही, सुनील प्रभूंचा आरोप


आशिष शेलारांचं प्रकरण हायकोर्टात, त्यावर बोलता येणार नाही – फडणवीस


तुमच्या हलर्जीपणामुळे बालक मेलीत तुमच्या आश्रू येत नाहीत का? – फडणवीस


निष्पाप बालकांच्या मृत्यूनंतरही तुम्हाला संवेदना नाहीत का? – फडणवीस


भांडूपच्या नर्सिंग होममध्ये तीन दिवसांत चार दुर्दैवी बालकांचा मृत्यू – देवेंद्र फडणवीस


आयसीयू प्लांटमध्ये बिघाड झाल्याने चार लहान बालके दगावली – फडणवीस


मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी, अतिरिक्त आयुक्त यांना निलंबित करा, फडणवीसांची मागणी


नायरमध्ये बालकांचा मृत्यू, भंडारातही बालकांचा मृत्यू आणि भांडूपमध्येही बालकांचा मृत्यू लहान बालकांचा आक्रोश तुमच्या कानावर येत नाही का? फडणवीसांचा शिवसेनेला सवाल


बालकांच्या मृत्यूबाबत तुमच्या संवेदना नाहीत का? – फडणवीस


घडलेली घटना दुर्दैवी असून गंभीर आहे, स्थगन प्रस्तावास मान्यता द्या – फडणवीस


नायर रुग्णालयातील बाळाच्या मृत्यूवरुन भाजप नेते आक्रमक


राज्यातील रुग्णालयांमधील आग दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा


ज्यांनी मास्क लावला नाही, त्यांना सभागृहात बाहेर काढा – अजित पवार


५ लाख जण मृत्यूमुखी पडली, WHOचा इशारा – अजित पवार


रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर चालली आहे – अजित पवार


ठराविक जण सोडले तर विधानसभेत कोणीच मास्क लावत नाही – अजित पवार


विधानसभेतील आमदारांनी मास्क लावायला पाहिजे – अजित पवार


बोलून झाल्यानंतर मास्क लावायला पाहिजे – अजित पवार


विधान परिषदेच्या नियमित कामकाजाला सुरुवात


प्रकाश आंबेडकरसह वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


विधान परिषदेचे नियमित कामकाज १२ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार


कोर्ट ओबीसी आरक्षण विरोधात नाही, सरकार ओबीसी आरक्षणाविरोधात – प्रकाश आंबेडकर


अनेक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात – प्रकाश आंबेडकर


लोकांचा आवाज दाबला जातोय – रेखा ठाकूर


सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला.


वंचित कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांकडून धरपकड


पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट


वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनात परिसरात दाखल


ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक


राज्यस्तरावर एक एसआयटी समिती स्थापना करणार, धमक्यांप्रकरणी एसआयटीद्वारे चौकशी होईल. – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीचा निषेध – नाना पटोले


आमदारांच्या समितीचे गठन करा – सुधीर मुनगंटीवार


मंत्र्यांना आलेल्या धमकीचा पोलिसांकडून योग्य तपास होत नाही – सुधीर मुनगंटीवार


छगन भुजबळ वकील असते तर हरिश साळवेंनंतर त्यांचाच नंबर – फडणवीस


आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीचे गंभीर प्रकरण राजकीय करू नये – फडणवीस


सनातन हा प्रोब्लेम नव्हे महाभयंकर प्रोब्लेम आहे – भुजबळ


महाराष्ट्रातील नेत्यांना धमकी आलीय म्हणून कर्नाटकच्या पोलिसांनी गप्प बसू नये – भुजबळ


आदित्य ठाकरेंना दिलेली धमकी ही अतिशय गांभीर्याने घेण्याची गोष्ट – छगन भुजबळ


आदित्य ठाकरे यांना धमकी दिल्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे – फडणवीस


आदित्य ठाकरेंना धमकी दिल्याच्या प्रकरणाला सुनील प्रभूंनी राजकीय वळण दिले – फडणवीस


आदित्य ठाकरे यांना धमकी देण्याबाबत आम्ही निषेध करतोय – फडणवीस


सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एसआयटीची स्थापना केली पाहिजे – नवाब मलिक


सुशांत सिंह राजपूत ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी ३० लाख रुपयांची रसद दिल्याचा गंभीर आरोप भाजपवर अल्पसंख्यांक नवाब मलिक यांनी केला.


नोटाबंदीनंतर आर्थिक चणचणीमुळे बंद पडलेल्या ५२३ एसआरए योजना पुर्नजिवित करण्यासाठी गृहनिर्माण विभाग कर्जमाफी योजना आणणार -जितेंद्र आव्हाड

नवीन नियम, धोरण १ जानेवारी २०२२ पर्यंत मुख्यमंत्री यांच्या मंजुरीनंतर योजना मांडणार – जितेंद्र आव्हाड


शक्ती कायदा अतिशय प्रामाणिकपणे मांडला, मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती


महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचं लाक्षणिक उपोषण


दहावीच्या विद्यार्थ्यांना ३ मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची सवलत, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना १४ मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची सवलत, याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.
१०वी, १२वीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर


अनिल परब उत्तर देत असताना नितेश राणे मध्येच बोलले


नितेश राणे जागेवर न बसल्याने अनिल परबांकडून आक्षेप व्यक्त


परिवहन अनिल परब आणि भाजप आमदार नितेश राणेंमध्ये हमरीतुमरी


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात जात असताना नितेश राणेंची घोषणाबाजी


विधान परिषदेचे कामकाज सुरू


विधान परिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब


विधानसभेच्या कामकाज सुरुवात


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही अधिवेशनाला उपस्थितीत राहण्याची शक्यता कमी


हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोध आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. पेपरफुटी, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदतीवरुन सरकार विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.


विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात


विधानसभा अध्यक्ष निवड आवाजी मतदानाने करण्याबाबतची प्रक्रिया आज पार पडणार आहे. पुढच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण आणि के.सी. पाडवी यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.


वंचित बहुजन आघाडी विधानभवनावर आज मोर्चा काढणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या जातीनिहाय गणनेची मागणी सरकारकडे केली आहे. यासाठी आज विधानभवनावर मोर्चा निघणार आहे. जमावबंदीचा आदेश झुगारून प्रकाश आंबेडकर सीएसएमटी ते विधान भवन असा मोर्चा काढण्यासाठी विचारावर ते ठाम आहेत.


आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. काल, बुधवारी विधानसभेत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. अंगविक्षेप करून पंतप्रधानांची नक्कल करणार्‍या जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. तसेच बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. तो मुद्दा बुधवारी विधान परिषदेत घेण्यात आला. परिषदेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे निवेदन देत होते. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांच्या बाकावरून एका आमदाराने, मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, अशी घोषणा दिली. मात्र, पुढची घोषणा देण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना रोखले आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणा, अशी सूचना केली. त्याबरोबर सभागृहात एकच हशा पिकला. त्या आमदारांनी मग आपली चूक दुरुस्त केली. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी काय गोंधळ होतोय? याकडे सर्वांचे लक्ष.

बुधवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात काय झाले? 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -