नाना पटोलेंनी घेतली फडणवीसांची भेट; विधान परिषदेची पोटनिवडणूक होणार बिनविरोध?

MLC election devendra fadnavis reacts on nana patole nagpur mlc win assurance\
MLC election: नागपूरमध्ये काँग्रेसला अपेक्षित चमत्कार घडणार नाही, फडणवीसांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून याव्यात यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षांशी बोलणार असल्याचं नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितलं होतं.

पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी नाना पटोल यांनी गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर भाजप काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत २२ नोव्हेंबर २०२१ अशी आहे. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. प्रज्ञा सातव यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेचे सदस्य असताना राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती. आता विधान परिषदेसाठी सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून संजय केनेकरांनी भरला उमेदवारी अर्ज

या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्यावतीने १५ नोव्हेंबरला औरंगाबादचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.