घरताज्या घडामोडीविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची राजकीय पक्षांची मागणी

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची राजकीय पक्षांची मागणी

Subscribe

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक होत असल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी  सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्यानुसार अधिवेशन एक आठवडाभर पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळते.

मात्र वैद्यकीय उपचारानंतर सध्या विश्रांती घेत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लवकरच कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात हिवाळी अधिवेशन मुंबई की नागपूर यापैकी नेमके कधी होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी येत्या १० डिसेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी राजकीय पक्षांचे नेते काही काळ या कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलावे याबाबत मागणी केल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून या बैठकीतच  अधिवेशनाबाबत निर्णय होईल. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

आगामी हिवाळी अधिवेशनावरही करोनाचे सावट कायम असल्याने अधिवेशनात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत सर्वांना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक असेल. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक राहील. विधानभवन परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. डोस घेतला असला तरी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक राहील.


हेही वाचा : १७ नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, ‘या’ सहा खेळाडूंची होणार अग्निपरीक्षा


येत्या १० डिसेंबरला विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन एका आठवड्यासाठी पुढे ढकलावं. अशी सर्वच पक्षांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक घेणार आहेत. त्यानंतर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर या दोन शहरांमध्ये कुठे आणि कधी होणार ? हे अधिकृतपणे जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -