Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Maharashtra Lockdown 2021: अवघे २ तास अन् २५ पाहुणे, लॉकडाऊनचं पहिले लग्न...

Maharashtra Lockdown 2021: अवघे २ तास अन् २५ पाहुणे, लॉकडाऊनचं पहिले लग्न उरकले माहिमच्या जोडप्याने

Related Story

- Advertisement -

लग्न म्हटले की, दोन मनांचे, जिवांचे आणि कुटुंबाचे एक अनोखे मिलन असते. अनेक नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात, वाजगाजत लग्न सोहळा पार पडतो असतो. पण आता लग्न सोहळ्याचे चित्र कोरोनामुळे काहीसी बदललेले आहे. पहिल्यांदा कोरोनामुळे ५० जणांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्न सोहळा करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्न सोहळ्यासंदर्भातील निर्बंध आणखीनच कडक करण्यात आले. मात्र राज्यातील आताच्या कडक लॉकडाऊनच्या दरम्यान लग्न सोहळा फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत २ तासांत उरकरण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज मुंबईतील माहिममधील जोडप्याने राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून लग्न उरकले आहे. हे लॉकडाऊनमधील पहिलेच लग्न आहे.

लॉकडाऊनच्या काळात २५ लोकांच्या उपस्थितीत २ तासांमध्ये मुंबईत माहिमध्ये पहिले लग्न झाले. या जोडप्याने राज्य सरकारने दिलेल्या सर्व सूचनांनुसार आपला लग्न सोहळा पार पडला. या जोडप्यातील वराचे नाव विशाल राडेकर, तर वधुचे नाव श्वेता डोलास असे आहे. आज या दोघांचा माहिमध्ये लग्न सोहळ्या साध्या पद्धतीने झाला.

लग्न समारंभासाठी निर्बंध

  • लग्न समारंभासाठी अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकेच नाही तर अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम पार पाडणं बंघनकारक आहे.
  • या नियमांचं पालन केले नाही तर तब्बल ५० हजार रुपयांचा दंड कुटुंबांना ठोठावला जाईल. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Second Wave Peak : भारतात ‘या’ कालावधीत कोरोना दुसऱ्या लाटेचा Peak Period ? IIT


 

- Advertisement -