Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला

Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ मेच्या सकाळी १० वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण हा कडक लॉकडाऊन करूनही राज्यात त्याचा काहीच परिणाम दिसून आला नाही. अजूनही कोरोनाबाधितांची संख्या तितक्याचे झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे आता राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश मुख्य सचिव सिताराम कुंटेंनी दिले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवड्याने वाढविण्याची मागणी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवला जाणार असून यासंदर्भात ३० एप्रिल किंवा १ मे रोजी सूचना काढण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना बुधवारी दिली होती. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत आता राज्यातील लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला आहे. हा लॉकडाऊन १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

या लॉकडाऊन दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना फर्त मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांना हजर राहण्यासाठी परवानगी आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. दरम्यान सर्व सामान्यांसाठी लोकल, मेट्रो आणि मोनो प्रवास पूर्णतः बंद असणार आहे.

नियमावलीत नेमके नियम कोणते?

- Advertisement -

1. १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
2. १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5. राज्यात जिल्हा बंदी लागू
6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9. सार्वजनिक वाहतूक ५०% क्षमतेनं चालणार
10. एसटी बस वाहतूक ५०% क्षमतेनं सुरू राहणार
11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास १० हजार दंड
13. सरकारी कार्यालयांमध्ये १५% उपस्थिती
14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं १५% हजेरीनं चालणार
15. लग्न समारंभासाठी २५ जणांना फक्त २ तासांसाठी परवानगी
16. लग्नाचे नियम मोडल्यास ५० हजार दंड भरावा लागणार
17. बाहेरून येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करणार
18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार


हेही वाचा – होम आयसोलेटेड, सौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन जारी


 

- Advertisement -