घरताज्या घडामोडीMaharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढवला; १ जूनला नियमावली जाहीर...

Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढवला; १ जूनला नियमावली जाहीर होणार – राजेश टोपे

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच यासंदर्भातील नियमावली १ जूनला जाहीर करण्यात येईल. पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेवरील असलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

नक्की काय म्हणाले राजेश टोपे?

‘राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्यात आलेला आहे. परंतु त्यासाठीची नियमावली १ जूनला जाहीर करण्यात येईल. ज्या ठिकाणी जास्त रुग्णसंख्या असेल, पॉझिटिव्हीटी रेट जास्त असेल, तसेच बेड्स उपलब्धतेत अडचणी येत असतील, त्या ठिकाणी लॉकडाऊन जास्त शिथिल केला जाणार नाही. परंतु ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, त्या ठिकाणी १ जूनला मार्गदर्शक सूचना काढण्यात येतील. त्या अनुषंगाने येथील महापौर आणि अन्य लोकांनी सूचना केल्या आहेत. त्याचा विचार निश्चित पण केला जाईल,’ असे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

तसेच पुढे टोपे म्हणाले की, ‘शनिवार आणि रविवारी पुण्यात दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. पण शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू ठेवाव्या, अशी सर्व लोकप्रतिनिधींची इच्छा होती. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील हा आग्रह केला होता. त्यामुळे आता शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेवर असलेले निर्बंध टाकून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

‘दरम्यान पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. येथील कोरोनाची परिस्थिती समाधनकारक आहे. तसेच पुण्यातील होम आयसोलेश कमी झाले आहे,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Antibody Cocktail: भारतात कोरोनावर आता कॉकटेल उपचार सुरू; एका डोसची किंमत ऐकून व्हाल हैराण


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -