Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माझ चॉकलेट तू का काढून घेतलंस?, भाजपला आव्हाडांचे चिमटे अन् एकत्र येण्याचे...

माझ चॉकलेट तू का काढून घेतलंस?, भाजपला आव्हाडांचे चिमटे अन् एकत्र येण्याचे आवाहनही

महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता पडत असल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. रेमडेसिवीरची साठवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले होते. यानंतर राज्या महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. यामध्ये राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना पुन्हा टोला लगावत एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले आहे.

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ब्रूक्स फार्मा या कंपनीचे साठेबाजी करणे आणि औषधे काळ्या बाजारात विकणे त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरात मध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारख माझ चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल, असा शब्दात ट्विट करत सर्व राजकारण्यांना एक होण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पार्ल्याच्या पोलीस स्थानकाज दाखल झाले होते. फडणवीसांसोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड होते. यावेळी पोलीसांच्या तपासामध्ये फडणवीसांनी हस्तक्षेप करत चौकशीत अडथळा आणला. रेमडेसिवीरचा काळाबाज करणाऱ्या कंपनीच्या मालकाला पाठीशी घातल्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या आहेत.

- Advertisement -