घरमहाराष्ट्रसंचारबंदीचा पहिला दिवस, कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ; लोकांचा प्रतिसाद कसा?

संचारबंदीचा पहिला दिवस, कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ; लोकांचा प्रतिसाद कसा?

Subscribe

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंध (Maharashtra Curfew 2021) लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. रेल्वे, बसमधून अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी आहे. यामुळे एकप्रकारे राज्यात लॉकडाऊन लागू झाला आहे. संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने काही ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही ठिकाणी वर्दळ पाहायला मिळाली. (Maharashtra lockdown 2021 updates)

मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकलसाठी काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. दादर येथे संचारबंदीचं कडेकोट पालन करण्यात आल्याचं पाहयसला मिलालं आहे. कल्याण येथे निर्बंध पायदळी तुडवत नागरिक रेल्वे स्थानकात प्रवेश करताना दिसले. कल्याण रेल्वे स्थानकात गर्दी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरारमध्ये देखील संचारबंदीचं उल्लंघन झाल्याचं पाहयला मिळालं. यामुळे आता गर्दी रोखण्याचं पोलीस प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.

- Advertisement -

रत्नागिरीत संचारबंदीला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रस्ते, बाजारपेठा, चोक सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळाला. तर दुसरीकडे पुण्यात मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. तर स्वारगेट भागात शुकशुकाट पाहायला मिळाला. कोल्हापुरात थोडी वर्दळ होती. तर नागपूरातील रस्ते ओसाड पाहायला मिळालं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -