Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होताच कामा नये - भाई जगताप

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होताच कामा नये – भाई जगताप

Related Story

- Advertisement -

राज्यात लॉकडाऊन संदर्भात गोंधळ सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने लॉकडाऊन लावावा लागेल. नागरिक कोरोनासंबंधित नियम पाळत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनसंदर्भात तयारी करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, लॉकडाऊनला काँग्रेसचा विरोध आहे. याबाबत सातत्याने काँग्रेसचे नेते बोलत आहेत. आज देखील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होताच कामा नये, असं म्हटलं आहे.

लॉकडाऊनच्या बाबतीत वेगवेगळे सूर व प्रवाह ऐकायला मिळत आहेत. पण काँग्रेसचे स्पष्ट मत आहे की, लॉकडाऊन होताच कामा नये. कारण मागच्या वर्षी लॉकडाऊन झाला, त्यानंतर वर्षभर सर्वसामान्य नागरिकांची इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. कामगार, व्यापारी, छोटे आणि मोठे उद्योजक, सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच या वाईट परिस्थितीतून त्यावेळेस जावे लागले होते. या लॉकडाऊनमध्ये जनतेने आयुष्यभर जे जमवलं होतं, ते वापरुन कसा बसा आपला संसार चालवला होता. पण आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले, तर मात्र त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर होतील. म्हणून लॉकडाऊन हा होताच कामा नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आणि आणि यापुढे ही हीच भमिका राहील, असं भाई जगताप म्हणाले.

- Advertisement -

शासनाने रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शालान्त परीक्षांवर परिणाम होणार आहे. अनेक शिक्षम संस्थांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा पालकवर्ग यांनी भेटून समस्या सांगितल्या, असं भाई जगताप म्हणाले.

 

- Advertisement -