राज्याच्या कोणत्या भागात नियम शिथिल होणार? नेमके काय पुन्हा सुरू होणार? कुठे निर्बंध कायम राहणार?

Maharashtra Unlock: process of unlock will start in five stages in Maharashtra state from June 7, see the new rules

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत कमालीची घट झाली. नव्या रुग्णांची संख्याही घटली. तसेच मृत्यूही कमी होऊ लागले. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन खूपच फायदेशीर ठरला आहे. मात्र, हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन उटणार की आणखी लांबणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, राज्य सरकारकडून एकदम लॉकडाऊन उठविणारा नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईसह राज्यात किमान पन्नास टक्के नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन पूर्णपणे हटविणे धोक्याचे ठरणार असल्याचे मत राज्याचे वस्त्रोदयोग मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गेल्यावर्षी जी चूक केली ती यावर्षी करणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवले जाईल. यामध्ये चार टप्पे असतील आणि त्या टप्प्यानुसार लॉकडाऊन उठवला जाईल, असे संकेत दिले जात आहेत.

१४ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी शिथिलता करण्यात येईल

राज्यातील १४ जिल्हे वगळता इतर ठिकाणी कोरोनाच्या नियमामध्ये शिथिलता करण्यात येण्याची शक्यता आहे. कारण या १४ जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुन देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. त्यामुळे हे १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येतील.

हे आहेत १४ जिल्हे रेड झोनमध्ये

बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे १४ जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे ३१ मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.

पहिल्या टप्प्यात काय सुरु?

 • व्यापाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल
 • प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेस्ट कंट्रोल करायला परवानगी
 • पुर्वपरवानगी घेऊन गॅरेजमध्ये गाड्यांवर काम करण्यास परवानगी
 • सार्वजनिक ठिकाणी वॉकला आणि सायकलिंगला परवानगी
 • समुद्र किनारे, सोसायटीत, बागेत व्यायाम करण्यास परवानगी

दुसऱ्या टप्प्यात काय सुरु?

 • मॉल्स आणि शॉपिंग कॉम्पलेक्स वगळता इतर दुकानं सुरु राहतील
 • दुकानं दिवसाआड सुरु राहतील
 • दुकानांत होम डिलिव्हरी, टोकन सिस्टीम राबवली जाईल

तिसऱ्या टप्प्यात काय सुरु?

 • १० टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालयं सुरु होतील
 • घरी आणि ऑफिसमध्ये मास्क आणि सॅनिटायजेशन बंधनकारक
 • ५० टक्के क्षमतेसह जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक सुरु राहिल
 • हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, मद्याची दुकानं निर्बंधासह उघडण्यास परवानगी

चौथ्या टप्प्यात काय सुरु?

 • लोकला परवानगी मिळण्याची शक्यता
 • मंदीर, मशिद, चर्चसह सर्व प्रकारची प्रार्थना स्थळे उघडली जातील

काय राहणार बंद?