घरमहाराष्ट्रमोठी बातमी! राज्यात दोन आठवडे लॉकडाऊन?; दोन दिवसांत निर्णय

मोठी बातमी! राज्यात दोन आठवडे लॉकडाऊन?; दोन दिवसांत निर्णय

Subscribe

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, निर्णय झालेला नाही. परंतु राज्यात दोन आठवडे लॉकडाऊन लागण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. राज्यात लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी तज्ज्ञांच्या १४ दिवसांच्या लॉकडाऊनला समर्थन केलं आहे. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राज्यातील कोविड १९ टास्क फोर्स सोबत बैठक करून वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किती दिवस लॉकडाऊन करणार याचा निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनचा सुर दिसला. या बैठकीत मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्यावर जास्त भर देताना दिसले. १४ दिवसांचं लॉकडाऊन असावं असं तज्ज्ञांचं मत आहे. मुख्यमंत्री म्हणून मी या मताशी सहमत आहे. कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. ताबडतोबीने पावलं टाकली पाहिजेत. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

चांगल्या सूचना आल्या आहेत मी त्याची नोंद घेतली आहे. कडक निर्बंध हवेत आणि सूटही पाहिजे हे दोन्ही गोष्ट एकत्र शक्य नाही. आता तरी आपल्याला कडक निर्बंध करुन थोडी कळ सोसावी लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. व्यापऱ्यांशी मी बोललो. होम डिलिव्हरी, टेक अवेला दोन तीन दिवस लागतील. सुरुवातीला कडक निर्बंध लावू.

त्यानंतर ८ दिवसांनी एक एक गोष्ट सुरू करू. कडक निर्बंध लाऊ, ८ दिवस लाऊडाऊन हा सध्या मार्ग आहे, असं मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. जो नवीन स्ट्रेन आहे तो व्हॅक्सिननेही थोपवला जात नाहीये, कडक निर्बंधाशिवाय पर्याय नाही, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. दोन डोस घेऊन सुद्धा अजून माझ्या शरिरात अँटी बॉडी तयार झाल्या नाहीत. आज काही तरी निर्णय घेण्याची आवश्यकता, असं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

गैरसमज पसरवणाऱ्यांशी चर्चा काय करायची?

संभाजी भीडे यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोना हा रोगच नाही, जे मृत पावले ते जगायच्या लायकीचे नव्हते, असं विधान केलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच फटकारलं. कोरोना हा रोगच नाही असा गैरसमज पसरवणारे आहेत, अशा लोकांशी काय चर्चा करायची? कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. ताबडतोबीने पावलं टाकली पाहिजेत. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -