Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मोठी बातमी! राज्यातील कोविडच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट नाही

मोठी बातमी! राज्यातील कोविडच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट नाही

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोविडच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्या निर्बंधातून सूट मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, सूट देण्याबाबत कोणताही निर्णय आजच्या बैठकीत झाला नाही.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात रोजची रुग्णसंख्या सात ते नऊ हजार आहे. ९२ टक्के रुग्ण हे १० जिल्ह्यातील आहेत. तर २६ जिल्ह्यांमध्ये उर्विरीत ८ टक्के आहे. हॉटेलचे मालक, दुकानदारसुद्धा आम्हाला जास्त वेळ दुकान सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहेत. राज्यात सध्या निर्बंध आहेत. या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय झाला नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्ष

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित केलं जाणार आहे.

ऑगस्टमध्ये साडे चार कोटी लसी मिळण्याची शक्यता

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भाने केंद्राने सांगितलं आहे. विदेशात तिसरी लाट आलेली दिसते. कोरोना लसीकरणासंदर्भात अधिक लसी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.आपल्या राज्यामध्ये खासगी हॉस्पीटल्स, मोठे उद्योजक यांच्या माध्यमातूनन २५ टक्के लसींचा वाटा राज्याला कसा मिळवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे, याविषयी मी आजच्या बैठकीत सांगितलं. साडेचार कोटी लस ही ऑगस्टमध्ये मिळण्याची आशा आहे. देशाला एकूण ४२ कोटी लस देशाला मिळणार आहे. खासगी दवाखान्यांना ज्या लसी मिळणार आहेत. त्या आपल्याला जास्तीत जास्त कशा मिळतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. रोज पाच सहा लाख लसी मिळतात पुन्हा मिळत नाहीत. आपल्याला ज्या लसी मिळतात त्या लगेच देण्याचा आपण प्रयत्न करतो. कोणत्याही जिल्ह्यात लसी पडून नसतता. आपली कार्यक्षमता मोठी आहे. लोकांमध्ये जागृती झाली आहे. गर्दी होत आहे. रांगा लागत आहेत. त्यामुळे केंद्राने लस लवकरात लवकर द्याव्यात. त्यासाठी मी नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

दोन डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देणार

- Advertisement -

बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आधी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं जातं. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -